शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

Health : आपण लाजिरवाणे तर होत नाही ना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:45 IST

बहुतांश पुरुषांना आरोग्यासंदर्भात अशा काही समस्या असतात, ज्यामुळे दुसऱ्यासमोर लाजिरवाणे व्हावे लागते.

-Ravindra Moreबहुतांश पुरुषांना आरोग्यासंदर्भात अशा काही समस्या असतात, ज्यामुळे दुसऱ्यासमोर लाजिरवाणे व्हावे लागते. यातील बहुतेक समस्यांवर सहज उपाय मिळू शकतो. मात्र वेळेवर जर उपाययोजना केली नाही तर याच समस्या रौद्र रुप धारण करतात. आजच्या सदरात आपण अशा कोणत्या समस्या आहेत ज्यामुळे लाजिरवाणे व्हावे लागते आणि त्यावर काय उपाय आहेत याबाबत जाणून घेऊया.*टक्कल पडणे-कित्येक पुरुषांना तरुणपणातच टक्कल पडते. शरीरातील लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स अशा न्युट्रिशन्सची कमतरता किंवा ताणतणाव वाढल्याने डोक्याचे केस गळतात व टक्कल पडते. -काय कराल?डायटमध्ये भाजीपाला, फळे, डेअरी प्रॉडक्ट्स, स्प्राऊट्स आणि दाळींचा समावेश करावा. यामुळे न्युट्रिशन्स मिळतील आणि रोज व्यायाम किंवा फिरायला जा. यामुळे ताणतणाव कमी होईल.* जास्त केस-शरीरातील एंड्रोजन हार्मोन्स बॅलन्स बिघडल्याने केसांची वाढ जास्त होते. यामुळे पुरुषांच्या पाठीवर आणि काही सेंसेटिव्ह भागावर केस वाढतात.-काय कराल?रेजर किंवा हेअर रिमुव्हिंग क्रीमचा वापर करु शकता. शिवाय लेजर ट्रिटमेंटने कायमस्वरुपी जास्त केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. * इनलार्ज प्रोस्टेटवय वाढण्याबरोबरच इनलार्ज प्रोस्टेटची समस्या सतावू लागते. यामुळे सतत बाथरुमला जावे लागते. -काय कराल?युरिन रिलेटेड प्रॉब्लेम असल्याने लगेचच डॉक्टरांना भेटा. योग्य औषधोपचार केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. * पोटाचा मोठा घेरावपुरुषांचा टमी फॅट वेगाने वाढतो. अनहेल्दी आणि जास्त कॅलरीजचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने शिवाय अ‍ॅक्टिव न राहिल्याने पोटाचा घेर वाढतो.-काय कराल?रोज कमीत कमी ३० मिनिटे वेगाने चाला किंवा व्यायाम करा. तसेच जास्त गोड आणि तेलकट खाणे टाळा.* श्वासाची दुर्गंधीतोंडाच्या सफाईकडे लक्ष न दिल्याने बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. तसेच जास्त कांदे, लसूण खाल्ल्याने आणि मद्यपान, धुम्रपान केल्याने ही समस्या वाढते. -काय कराल?रोज किमान दोन वेळेस ब्रश करा. काहीही खाल्ल्यानंतर गुळणी करा तसेच खाल्ल्यानंतर बडीशेप किंवा इलायची खा.* घोरण्याची समस्याकित्येक पुरुषांना जोरजोराने घोरण्याची समस्या असते. झोपतेवेळी व्यवस्थित श्वास घेता येत नसल्याने ही समस्या उद्भवते. -काय कराल?रात्रीला झोपण्याअगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.* घामाची दुर्गंधी- कित्येक पुरुषांना घामाच्या दुर्गंधीची समस्या सतावते. शरीराची व्यवस्थित साफसफाईची काळजी न घेतल्याने ही समस्या जास्त बळावते. -काय कराल?पाण्यात थोडे मीठ किंवा फिटकरी टाकून आंघोळ करा. यामुळे बॅक्टेरिया नियंत्रणात राहतील आणि घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल