शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​नैराश्याने त्रस्त असाल तर करा हा उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 19:19 IST

एका नव्या संशोधनानुसार चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ च्या नियमित वापराने नैराश्य आणि मानसिक आजार बऱ्यापैकी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आज धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण नैराश्याने त्रस्त असल्याचे दिसून येते. नैराश्य दूर व्हावे आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करुन त्यावर योग्य उपाय शोधले जातात. त्यातच एका नव्या संशोधनानुसार चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ च्या नियमित वापराने नैराश्य आणि मानसिक आजार बऱ्यापैकी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे संशोधन ‘क्लिनिकल सायकॅटरी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार न घेणाऱ्या अमेरिकेतील चिनी नागरिकांसाठी संशोधकांनी १२ आठवड्यांचा ‘ताय ची’ या प्रकाराची माहिती देणारा आणि सरावाचा कार्यक्रम घेतला. यादरम्यान मानसिक उपचारांपेक्षाही ‘ताय ची’मुळे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होत असल्याचे दिसून आले. या अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा यात समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेले सर्वच जणांना गंभीर मानसिक आजार होता. तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार सुरू नव्हते. तसेच काही जणांवर याआधी करण्यात आलेल्या मानसिक उपचारांचाही या कार्यक्रमात विचार करण्यात आला नव्हता. सहभागी झालेल्यांचे तीन गट करण्यात आले. त्यात मानसिक ताणतणावावर चर्चा करण्यात आली तसेच ‘ताय ची’चे मार्गदर्शन करण्यात आले. १२ आठवड्यांच्या कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्यांचे मानसिक आरोग्य सुधारल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात मानसिक आजार आणि नैराश्यावर ताय ची प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. वैद्यकीय उपचारांप्रमाणेच हा उपक्रम परिणामकारक असल्याचे मॅसॅच्युएट्स रुग्णालयाचे अल्बर्ट येऊंग यांनी म्हटले आहे.Also Read : ​World Health Day 2017 : डिप्रेशनशी लढताना "या" ५ गोष्टी कराच !