शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 18:36 IST

एखादा पदार्थ खाल्ल्याने किंवा ब्रश न केल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी बाहेरील माउथ फ्रेशनर न वापरता घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी घालविता येऊ शकते.

एखादा पदार्थ खाल्ल्याने किंवा ब्रश न केल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी बाहेरील माउथ फ्रेशनर न वापरता घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी घालविता येऊ शकते. बडीशोप आपण अन्नाचे पचन व्हावे म्हणून जेवल्यावर बडीशोप खातो. पण हे एक उत्तम माउथ फ्रेशनरही आहे. बडीशोप लाळेची निर्मिती वाढवून दुर्गंधी निर्माण करणाºया किटाणूंचा नाश करते. बडीशोप खाल्याने पित्त आणि ढेकर यांचे प्रमाणही कमी होते. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी बडीशोप खाणे केव्हाही चांगले.पुदिनापुदिना हा प्रमुख घटक असलेले अनेक माउथ फ्रेशनर बाजारात उपलब्ध आहेत. विविध पदार्थांच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारी पुदिन्याची पाने त्यांच्या तीव्र सुगंध आणि थंडाव्यामुळे काही क्षणातच तोंडाची दुर्गंधी नाहीशी करतात. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी पुदिन्याची 2-3 पाने खावीत किंवा त्यापासून बनवलेला चहा प्यावा.पार्सलीपार्सली आपण खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी वापरतो. पार्सलीमध्ये जीवाणूंचा नाश करणारे क्लोरोफिल असल्यामुळे जेवणानंतर पार्सली खावे. हे सर्वात उत्तम माउथ फ्रेशनर आहे. काही माउथ फ्रेशनर, साबण आणि परफ्यूममध्ये सुगंधासाठी पार्सलीचे तेल घालतात.लवंगसुवास आणि स्वादामुळे लवंगाचा स्वयंपाकात उपयोग केला जातो. फार पुर्वीपासून दातदुखीसाठी, टूथपेस्टमध्ये व माउथवॉशमध्ये लवंगाचा उपयोग केला जातो. एखादी लवंग तोंडात ठेवणे हा तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.दालचिनी दालचिनीमध्ये जंतूनाशक घटक असून ती तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. तुम्ही दालचिनीच्या काही काड्या चावू शकता किंवा चहामध्ये घालू शकता. दालचिनीच्या 5-6 काड्या पाण्यात घालून ते उकळावे. थंड झाल्यावर या पाण्याचा उपयोग माउथवॉश म्हणून होऊ शकतो.वेलची वेलचीचे दाणे सुगंधी व स्वादिष्ट असल्याने तोंडाला दुर्गंधी येत नाही. एखादी वेलची चघळल्यास काही मिनिटांतच तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते. जेवल्यानंतरही तुम्ही वेलचीचा चहा पिऊ शकता.लिंबूवर्गीय फळे संत्री, लिंबू यांसारखी फळे लाळेची निर्मिती वाढवतात. प्लाकपासून तयार झालेले अ‍ॅसिड निष्क्रिय करून तोंडातील डेड सेल्स आणि अन्नाचे कण नाहीसे करते.