शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

​HEALTH : ऋतिकच्या बहिणीचा दोनदा झाला आहे घटस्फोट, "या" आजाराने होती त्रस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:52 IST

अभिनेता ऋतिक रोशनची मोठी बहिण सुनैना रोशनचे काही फोटो नुकतेच व्हायरल झालेत, त्यात ती अगोदरपेक्षा खूपच सडपातळ आणि वेगळी दिसत आहे.

अभिनेता ऋतिक रोशनची मोठी बहिण सुनैना रोशनचे काही फोटो नुकतेच व्हायरल झालेत, त्यात ती अगोदरपेक्षा खूपच सडपातळ आणि वेगळी दिसत होती. सुनैनाने नुकतेच तिचे वजन घटविले म्हणून तिचा लुक असा बदलला. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यात खूप मोठ्या समस्या होत्या. तिचा एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट झाला आहे.सुनैनाने फॅशन डिझायनर आशिष सोनीसोबत लग्न केले होते. आशिष असे एकमेव फॅशन डिझायनर आहेत, ज्यांना न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘आॅलिंपस फॅशन वीक’ मध्ये बोलविण्यात आले होते. दोघांना सुरानिका नावाची मुलगीदेखील आहे. मात्र अवघ्या आठच वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. मात्र सुरानिका वडिलांजवळ राहते. त्यानंतर २००९ मध्ये सुनैनाने दुसरे लग्न मोहन नागरसोबत केले मात्र हे लग्नही जास्त काळ टिकले नाही आणि दोघेही विभक्त झाले.  एवढेच नव्हे तर २००८ मध्ये सुनैना कॅन्सरने ग्रस्त झाली. जेव्हा ती तिचे वडिल राकेश रोशन सोबत ‘क्रेझी-४’ या चित्रपटासाठी काम करीत होती तेव्हा तिला समजले की, तिला सर्वाइकल कॅन्सर आहे. तेव्हा मात्र पूर्णत: खचली होती. मात्र यावेळी तिचा भाऊ ऋतिक रोशनने तिला खूप साथ दिली. ऋतिकने सुनैनावर सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करुन घेतला आणि अवघ्या दोन दिवसाच्या आतच पहिली किमोथेरपीदेखील केली. सुनैनाला तिचे केस खूपच आवडायचे मात्र या आजारामुळे तिला तिचे केस गमवावे लागल्याने तिला खूप दु:ख झाले होते.     या व्यतिरिक्त ऋतिकची ब्रेन सर्जरी आणि त्यांनतर सुजैनसोबत त्याचा घटस्पोट या कारणांनी सुनैना खूप त्रस्त झाली होती आणि डिप्रेशनमध्येही गेली होती. त्यानंतर तिचे आहाराचे प्रमाण जास्त वाढले, त्यामुळे तिला डायबिटीज आणि फॅटी लीव्हरच्या समस्या निर्माण झाल्या. या सर्व कारणांनी तिचे वजन खूपच वाढले. मात्र तिने आता बैरिएट्रिक सर्जरी करुन सुमारे ६० किलो वजन घटविले आहे. वजन घटविल्यानंतर मात्र ती आता पहिल्यापेक्षा वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. Also Read : ​१३० किलो वजन असलेल्या सुनैनाला लोक म्हणायचे, ‘खरंच तू हृतिक रोशनची बहीण आहेस काय?