शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

HEALTH : निरोगी राहायचय? तर रिकाम्यापोटी खा हे ‘सात’ पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:25 IST

रात्रीच्या झोपेनंतर सकाळी आपण काय खातो यावर संपूर्ण दिवसाची दिनचर्या अवलंंबून असते. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी काय खावे याबाबत जाणून घेऊया.

-Ravindra Moreआज प्रत्येकाला वाटते की, आपण हेल्दी राहावं. मात्र बदलती जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आहारा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणता आहार कधी घ्यावा, याचे पथ्य ठरलेले आहे. रात्रीच्या झोपेनंतर सकाळी आपण काय खातो यावर संपूर्ण दिवसाची दिनचर्या अवलंंबून असते. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी काय खावे याबाबत जाणून घेऊया.* कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.* कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच इन्सुलिनच्या निर्मितीचेही कार्य सुधारते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यातील उपमा किंवा पोह्यातील कढीपत्ता बाजूला काढू नका.* अ‍ॅनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खावा. त्यातील आयर्न घटक हिमोग्लोबीन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.* रात्री बेदाणे / काळे मनुका पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यात उच्चप्रतीचे फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते.* दोन टीस्पून कोरफडीचा गर दोन टीस्पून जिऱ्याच्या पावडर सोबत प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. सोबत अर्धा ग्लास गरम पाणी प्यावे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.* ग्लासभर पाण्यात जिरं मिसळलेले पाणी प्यायल्यास हृद्याचे कार्य सुधारण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यातील पोटॅशियम घटक निरोगी स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.* लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबूपाणी प्या. हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्यास लठठपणा कमी करण्यास मदत होते. लसणामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.