शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

​Health : रोज एक-दिड तास प्रवास करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 17:15 IST

आपणही ऑफिसला येण्या-जाण्यासाठी प्रवास करीत असल्यास ‘हे’ नक्की वाचा

-Ravindra Moreआज प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यातच नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या अगणित आहे. एका संशोधनातुन असे आढळले की, जर आपण रोज एक -दिड तास कामानिमित्त प्रवास करीत असाल तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. रॉयल सोसायटी आॅफ पब्लिक हेल्थ रिपोर्टने हा अहवाल सादर केला असून त्यात पुढे म्हटले आहे की, प्रवास करताना बहुसंख्य लोक आपला वेळ बस, ट्रेन आणि कारमध्ये घालवतात. याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत असल्याचे नमुद केले आहे. भारतीयांच्या तुलनेने इंग्लंड मधील लोक प्रवासादरम्यान विशेष काळजी घेताना दिसतात. ते लांबचा प्रवास करताना सुमारे 800 कॅलरीचे पदार्थ सोबत ठेवतात आणि प्रवासादरम्यान खातात. मात्र ही गोष्ट भारतीयांमध्ये दिसत नाही, असेही या संशोधनात आढळले आहे. लांबच्या प्रवासामुळे ताण-तणाव तर वाढतोच शिवाय फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीही कमी होते. अशावेळी बीएमआय आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते. एवढच नव्हे, तर अधिक वेळ प्रवासात गेल्यास, आरोग्यासाठी उपयुक्त संतुलित आहारापासून आपण वंचित राहतो. तसेच  झोपही पूर्ण होत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो.या अभ्यासात असेही आढळले आहे की, ४४ टक्के लोक प्रवासादरम्यान तणावात असतात. कारण ते आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत. त्याचवेळी ४१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी कमी करतात. तर काही लोकांची झोप पूर्ण होत नाही, तर काहीजण प्रवासादरम्यान जंकफूड खूप खातात. एकत्रित या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. Also Read : ​HEALTH : ​प्रवासात मळमळ/ओकारी होतेय? या समस्येवर "हे" आहेत प्रभावी उपाय !