शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

HEALTH : पचनक्रिया बिघडलीय? तर घ्या हे ५ सूप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 15:10 IST

आज प्रत्येकाचे आयुष्य घाईचे झाले आहे. जेवण करायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अरबट-चरबट खाल्ले जाते शिवाय वेळेवर जेवणही केले जात नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या तक्रारी सुरु होतात.

-Ravindra Moreआज प्रत्येकाचे आयुष्य घाईचे झाले आहे. जेवण करायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अरबट-चरबट खाल्ले जाते शिवाय वेळेवर जेवणही केले जात नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या तक्रारी सुरु होतात. अशावेळी किमान औषधं घेण्यासाठी शरीरात उर्जा राहावी याकरिता नेमके काय खावे असा प्रश्न पडतो. म्हणूनच काही आहारतज्ज्ञांनी पचायला हलक्या आणि व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीनयुक्त काही सूप्सचे पर्याय सुचवले आहेत. मग पहा हे हेल्दी आणि टेस्टी पर्याय.कॅरट अ‍ॅन्ड कोरिएन्डर सूपगाजर वाफवून त्याची पेस्ट करा. त्यामध्ये कोवळ्या कोथींबीरीचे देठ, सेलेरीचे देठ, खिसलेले आलं मिसळा. हे सूप पिल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करते. रात्रीच्या जेवणाला हे सूप उत्तम पर्याय आहे.लेमन अ‍ॅन्ड कोरिएन्डर सूपतुमच्या आवडीच्या भाज्यांचे काप पाण्यात उकळा. त्यामध्ये मिरपूड, लवंग मिसळा. त्यासोबत कोथिंबीरीची पानं व लिंबाचा रस मिसळा. संध्याकाळच्या वेळेस हे सूप फायदेशीर आणि पोटभरीचे असते.पालक पनीर सूपतेलावर कांदा आणि लसूण परता. त्यावर पालकाची पेस्ट टाका. यामध्ये थोडं किसलेलं पनीर मिसळा. हे सारं मिश्रण एकत्र उकळा. यामध्ये अ‍ॅन्टीआॅक्सिडंट घटक अधिक असतात. जेवणात तुम्हांला पालक पनीर खाणं पसंत नसेल तर त्याला सूप प्रमाणे ट्विस्ट द्या. दालचिनीयुक्त टोमॅटो सूपचिरलेला कांदा, टोमॅटो उकळत्या पाण्यात घाला. त्यामध्ये लसूण,अक्रोडाचे काप आणि भाज्या मिसळा. एक उकळी आल्यानंतर त्याचे एकत्र मिश्रण करा. त्यामध्ये मिरपूड आणि दालचिनीची पावडर मिसळा.  हे सूप पिण्याअगोदर एकदा गरम करू शकता.  हे सूप उत्तम अ‍ॅपॅटायझर आहे सोबतच पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लाल भोपळ्याचे सूप लाल भोपळ्याचे काप, कांदा, लाल मिरच्या, आलं,मसूण पेस्ट भाजलेलं जिरं दोन कप पाण्यात शिजवा. प्रेशर कूकरमध्ये १० मिनिटे हे मिश्रण शिजवल्यानंतर कूकर थंड होऊ द्या. सारे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पेस्ट करा. हे सूप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.