शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिताय, सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 13:03 IST

कोल्ड्रिंक पिल्यामुळे तुमची तहान तर भागत नाहीच शिवाय त्यामुळे तुम्हाला ताजेतवानेही वाटणार नाही. कारण यामध्ये शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, कार्बनडायआॅक्साईड, शुगर सारखे घातक घटक असतात.

-Ravindra Moreउन्हाळ्यात शरीराचे पाणी कमी होत असलाने नेहमी तहान लागते, मग तहान भागविण्यासाठी बहुतांश आपण कोल्ड्रिंक पितो. मात्र ही सवय आपल्या आरोग्याला खूप हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण कोल्ड्रिंक पिल्यामुळे तुमची तहान तर भागत नाहीच शिवाय त्यामुळे तुम्हाला ताजेतवानेही वाटणार नाही. कारण यामध्ये शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, कार्बनडायआॅक्साईड, शुगर सारखे घातक घटक असतात.कोल्ड्रिंक पिल्याने काय होते नुकसान * लठ्ठपणाआपण जर सतत कोल्ड्रिंक पित असाल तर आपणास लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. कारण कोलामध्ये जास्त प्रमाणात शुगर, फ्रक्टोज सारखे कॅलरी वाढवणारे घटक असतात. त्यामुळे तुमचे वजन वाढून तुम्ही लठ्ठ होऊ शकता.* मधुमेहकोलामध्ये असलेल्या कॅलरीजमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.* हाडे ठिसूळ होतातकोल्ड्रिंक्स पिल्याने हाडे ठिसूळ होण्याचीही समस्या निर्माण होते. यात असलेले फॉस्फिरिक अ‍ॅसिड कॅल्शिअमचे शोषण थांबवते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात.* डिहायड्रेशनयामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले कॅफिन शरीराला डिहाड्रेट करते. त्यामुळे शरीराचे तेज कमी होते.* कॅन्सरअधिक प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्याने कॅन्सरचाही धोका संभवतो. यामध्ये असलेल्या कॅरेमल केमिकलमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते.* यकृतास हानीकोल्यामध्ये असलेले फ्रक्टोज सहजासहजी फॅटमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे यकृताला हानी पोहोचते.* अ‍ॅसिडीटी/अल्सरकोलामध्ये सामान्य पाण्याच्या तुलनेत अ‍ॅसिटीक क्विलिटी असते. त्यामुळे अ‍ॅसिडीटी वाढते व त्यामुळे अल्सरचा त्रास देखील होऊ शकतो.* कार्बन डायआॅक्साईडकोल्डड्रिंक फसफसण्यासाठी त्यामध्ये कार्बन डायआॅक्साईड मिसळले जाते जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.* व्यसनयामध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या शुगरमुळे मेंदूमध्ये डोपामिन नावाचे केमिकल तयार होते. त्यामुळे या पेयांचे व्यसन लागते.