शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : ‘हा’ व्यायामप्रकार केल्यास लाभते दिर्घायुष्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:41 IST

प्रत्येक व्यायामप्रकाराचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यातच पुश-अप हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी असून हा यामुळे दिर्घायुष्य लाभते असे संशोधनात म्हटले आहे.

-रवींद्र मोरे बहुतांश सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात. व्यायामाचे महत्त्व लक्षात घेता ते आपल्या व्यस्त शेड्यूलमधुनही व्यायामासाठी पुरेसा वेळ काढतात आणि वेगवगळ्या व्यायामप्रकाराने स्वत:ला फिट ठेवतात. व्यायामाने आपल्या शरीरवर काय परिणाम होतो, याविषयी आजपर्यंत बरेच संशोधन झाले आहे. प्रत्येक व्यायामप्रकाराचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यातच पुश-अप हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी असून हा यामुळे दिर्घायुष्य लाभते असे संशोधनात म्हटले आहे. उत्तम आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे सकस आहार, पुरेशी विश्रांती आणि आवश्यक व्यायाम होय. त्यात नियमित व्यायाम करणारे इतरांपेक्षा अ‍ॅक्टिव असतात. मात्र आॅस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी आॅफ सिडनीमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, पुश-अप्स व सिट-अप्ससारखे व्यायामप्रकार नियमित केल्यास अपमृत्यूचा धोका टळतो आणि दिर्घायुष्य लाभते, असे सिद्ध झाले आहे. या संशोधनात तब्बल ८० हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला, त्यात त्यांची दिनचर्येचा, ते करीत असलेल्या व्यायामपद्धतीचा व त्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात आला. पुश-अप्स व सिट-अप्स या प्रकारचा व्यायाम करणारे नागरिक अधिक निरोगी असतात. तसेच, या व्यायामामुळे त्यांना असलेल्या अपमृत्यूच्या धोक्यात २३ टक्क्यांनी घट होते. एवढेच नाही तर कर्करोगामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाणही या व्यायामामुळे ३१ टक्के घटते, असे निरीक्षण या अभ्यासात नोंदविले आहे.जॉगिंग, सायकलिंग अथवा अ‍ॅरोबिक आदी प्रकार निरोगी राहाण्यासाठी आवश्यक असतातच. मात्र स्नायुंना बळकटी देणारे पुश-अप्स व सिट-अप्ससारखे व्यायामप्रकार अधिक महत्त्वाचे ठरतात. या व्यायामप्रकारांमुळे अपमृत्यू तसेच कर्करोगाचा धोकाही टळू शकतो, अशी माहिती या विद्यापीठातील संशोधक एमॅन्युएल स्टॉमॅटॅकिस यांनी दिली. व्यायामशाळेमध्ये जाऊन वजनी उपकरणे अथवा अन्य माध्यमांच्या साह्याने व्यायाम करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र केवळ आपल्याच शरीराचा वापर करून म्हणजे पुश-अप्स, सिट-अप्ससारख्या प्रकारही व्यायामशाळेतील व्यायामाएवढेच लाभदायी ठरतात, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकन जर्नल आॅफ एपिडेमिओलॉजीमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.