शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​आपणही अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 15:06 IST

बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, धावपड, ताणतणाव अशा विविध कारणांनी प्रत्येकाला कधीतरी अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोच.

बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, धावपड, ताणतणाव अशा विविध कारणांनी प्रत्येकाला कधीतरी अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोच. काहीजण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यापूर्वीच काही महिने ते घरच्या घरीच अ‍ॅसिडिटीवर उपाय करतात. कुणी काही उपचार सांगितला की तो करून पाहणं, मेडिकलच्या दुकानात जाऊन स्वत:च अ‍ॅसिडिटीवर औषध मागून घेणं असा प्रकार सुरू होतो. काहीजण अ‍ॅसिडिटीची भावना कमी करायला भरपूर पाणी पितात किंवा गार दूध पितात, तर काही लोक हा विकार बळावला की मध किंवा आईस्क्रीम खातात. पण योग्य वैद्यकीय सल्ला घेणं या लोकांना महत्त्वाचं वाटत नाही.अ‍ॅसिडिटीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात वजन कमी होण्यास मोठी भूमिका अ‍ॅसिडिटीची आहे. यासाठी मात्र चालणे, सायकल चालवणे व पोहणे आदी व्यायाम केल्यास अ‍ॅसिडिटी दूर होण्यास मदत होते. शिवाय अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून पोटावर कोणताही ताण निर्माण करणारे व्यायाम टाळावेत. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मदतीने वजन कमी करणे आवश्यक आहे. काही ठरावीक योगासने आरोग्यासाठी उत्तम असतात. कमी जेवण करणे हादेखील चांगला पर्याय असून बऱ्याचदा डॉक्टर हा सल्ला देतात.