शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : ​‘या’ कारणांनी होते किडनी फेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 15:18 IST

किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे.

किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे. या समस्येला ‘अँड स्टेज रीनल डिसिज’ असे म्हणतात. किडनी फेल्यूअर म्हणजे दोन्ही किडनींनी काम करणे बंद करणे होय. आपल्या शरीरामध्ये दोन किडन्या असतात. यांचे मुख्य काम ब्लड फिल्टर करुन टॉक्सिन्स वेगळे करणे असते. हे टॉक्सिन्स यूरिनच्या माध्यमातून बाहेर पडतात. ज्यावेळी एखाद्या कारणामुळे किडन्यांची ब्लड फिल्टर करण्याची आणि वेस्ट मटेरियल काढण्याची क्षमता संपते, त्याला किडनी फेल्यूअर म्हटले जाते. आता मात्र डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटशिवाय जास्त दिवस जिवंतही राहता येत नाही. - कोणत्या कारणांनी होते किडनी फेल?* अति प्रमाणात धुम्रपान आणि मद्यपान केल्यास त्याद्वारे शरीरात टॉक्सिन्स वाढतात. किडनी या टॉक्सिन्सला फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे किडनी फेल होऊ शकते. * मिठाच्या जास्त सेवनाने रक्तदाब वाढतो. यामुळे कि डनीवर दबाव वाढल्याने फेल होण्याची शक्यता असते. * ताण-तणावामुळे शरीरात निर्माण होणारे हार्माेन्स किडनीला नुकसान पोहचवितात, त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता वाढते. * रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनीवर फिल्टर करण्याचा लोड वाढतो, यामुळे किडनी फेल होऊ शकते.- किडनी फेल होण्याचे हे आहेत संकेत* लघवी करताना रक्त येणे, त्रास होणे, जास्त लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, फेसळ लघवी येणे शिवाय टॉक्सिन्स व्यवस्थित फिल्टर होत नसल्याने आणि पाणी जमा झाल्याने शरीरात सूज निर्माण होते. याव्यतिरिक्त रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढल्याने त्वचेचे विकार, तोंडाची दुर्गंधी, उलटी होण्याची जाणिव अशा समस्या निर्माण होतात. याचबरोबर शरीरात टॉक्सिन्स वाढल्याने हाडे व जॉर्इंट पेन होऊ शकते. तसेच किडनी फेल झाल्याने ब्लडमध्ये आॅक्सिजनचा सप्लाय पुरेसा होत नाही त्यामुळे थकवा आणि कमजोरी येऊ शकते. - किडनी फेल होण्यापासून कशी काळजी घ्याल?* संतुलित आहार घेतल्यास किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.* मद्यपान, धुम्रपान, जंकफूड यापासून चार हात लांब राहा, यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होणार नाहीत.* भरपूर पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स फिल्टर होऊन बाहेर निघत राहतात आणि किडनी हेल्दी राहते. * आहारामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. यामुळे किडनीवर दबाव पडत नाही आणि किडनी हेल्दी राहते. * नियमित किमान अर्धा तास व्यायाम केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम राहते, यामुळे किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.