शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : ​आपणही ५-१० रुपयात बर्फाद्वारे "आजार" विकत घेत आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 14:40 IST

ज्यूस, गोळे बनविणाऱ्या दुकानांवरील बर्फाचे सॅम्पल घेतले. तपासणी अंतर्गत सुमारे ७० टक्के सॅम्पल ‘ई-कोली' बॅक्टेरियायुक्त आढळले.

-Ravidra Moreउन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी आपणही रस्ता लगतच्या दुकानांवरुन बर्फाचे गोळे, ज्यूस, बर्फाचे पाणी आदींचे सेवन करत असाल तर सावधान. नुकतेच मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने उन्हाळ्यात विकल्या जाणाऱ्या बर्फाच्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी ज्यूस, गोळे बनविणाऱ्या दुकानांवरील बर्फाचे सॅम्पल घेतले होते. तपासणी अंतर्गत सुमारे ७० टक्के सॅम्पल ‘ई-कोली' बॅक्टेरियायुक्त आढळले. हे बॅक्टेरिया पोटाच्या असंख्य समस्यांना कारणीभूत ठरतात. लोकांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी बीएमसीने अशा बर्फाच्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात सर्वत्र पोटासंबंधी तक्रारी वाढू लागतात. या तक्रारींना कारणीभूत म्हणजे बॅक्टेरियायुक्त बर्फाच्या पदार्थांचे सेवन. विशेषत: बॅक्टेरियायुक्त बर्फाचे पदार्थ रस्त्या लगतचे रंग-बिरंगे ज्यूस, गोळे आदींच्या दुकानांवर आढळतात. या पदार्थात आढळणाऱ्या ई-कोलाय या बॅक्टेरियामुळे लिव्हर इन्फेक्शन, डायरिया, कोलायटिस यासारखे आजार उद्भवतात. तज्ज्ञांच्या मतानुसार ई-कोली बॅक्टेरिया विशेषत: बर्फात आढळतो, आणि उन्हाळ्यात लोक बर्फाचा जास्त वापर करतात म्हणून या बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याची शक्यता या काळात जास्त असते. आपण या पदार्थाचे सेवन केल्याने त्याद्वारे हे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे गॅस्ट्रो, लिव्हर इन्फेक्शनसह अन्य आजार होतात. हेपेटायटिस आणि डायरियासारखे आजार ई-कोलीच्या कारणाने होतात. जर संक्रमित रुग्णाने वापरलेला रुमाल, साबण, भांडे किंवा अन्य कोणतीही वस्तूचा वापर दुसऱ्याने केला तर तो देखील बॅक्टेरियाने संक्रमित होऊ शकतो आणि आजारी पडू शकतो. यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह जिथे लोक ये-जा करतात, अशा ठिकाणी विशेषत: स्वच्छतेची काळजी घ्यावी. शिवाय या दरम्यान बाहेरील कुठलेही खाद्यपदार्थाचे सेवन करण्यापूर्वी ते चांगले स्वच्छ करुनच खावेत. रस्त्याकडचे कु ठल्याही प्रकारचे ज्यूस तसेच अर्धवट कापलेले फळ यांपासून चारहात लांबच राहावे.  Also Read : ​HEALTH : १० रुपयात विकले जात आहेत चालते-फिरते आजार !                                     : HEALTH : ​उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिताय, सावधान !