शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

डोकेदुखी, थकवा आहेत लोहाच्या कमतरतेची लक्षण, होऊ शकतात गंभीर परीणाम...करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:33 IST

शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते.चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊ.

शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे वाटू शकते. तसेच डोकेदुखीचाही त्रास होतो.  शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते.चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊ. शरीरामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. ते जाणून घ्या...

गूळ आणि शेंगदाणेगूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. ह्याला आपण नियमित खाऊ शकता.

स्प्राऊट्सअंकुरलेले कडधान्य सेवन केल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. दररोज सकाळच्या नाश्त्याला स्प्राऊट्स खाणे योग्य आहे.

डाळिंबडाळिंबात लोह मोठ्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमट दुधामध्ये 2 चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

बीटबिटाचे नियमित सेवनाने आपण आपल्या शरीरातील लोहाच्या कमतरतेला दूर करू शकता. बीटरूटला आपण सॅलड, रस किंवा सूप बनवून देखील पिऊ शकता.

ओट्सओट्स आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. ह्याचा सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकता.

ड्रायफ्रुट्सनियमितपणाने ड्राय फ्रूट्स सेवन करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात बदामाच्या सेवना पासून देखील करू शकता. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

लिंबूआपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करणं उत्तम आहे. यासाठी आपण लिंबाचे सेवन करू शकता. ह्याचा मुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेण्यास सुरू करू शकता. त्याच बरोबर सॅलड वर लिंबाचा रस पिळून खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न