शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सुखनिद्रा : हो, मी घोरतो! काय प्रॉब्लेम आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 08:15 IST

Happy sleep : निद्रेतील विकार हे गाढ झोपेत असल्यामुळे  सहजपणे ओळखले जात नाहीत, मग त्यांची सवय होते, त्यामुळे येणारा निरुत्साह / थकवा हा अंगवळणी पडून जातो.

- डॉ. अभिजित देशपांडे

अनेक वाचकांनी मला विचारले आहे, “इतकी वर्षे मी घोरतो, अजून तरी काही विशेष प्रॉब्लेम जाणवलेला नाही. मी कशाला  काळजी करू?” - एक साधा विचार करा : मी गेली अनेक वर्षं आजूबाजूला न पाहता रस्ता क्रॉस करतो, एकदाही ॲक्सिडेंट झाला नाही; पण म्हणजे मी कायम असेच वागावे का?  शहाण्या माणसाने अपघात टाळण्याच्या प्रयत्न करावा. निद्रेतील विकार हे गाढ झोपेत असल्यामुळे  सहजपणे ओळखले जात नाहीत, मग त्यांची सवय होते, त्यामुळे येणारा निरुत्साह / थकवा हा अंगवळणी पडून जातो.दिनेश चव्हाण आणि त्यांची पत्नी यांचा अनुभव पाहा : झोप लागायला प्रॉब्लेम येतो, गाढ झोपेतून जाग येते आणि परत झोपण्यास वेळ लागतो, ही दिनेशची तक्रार होती. त्याची पत्नी सांगत होती, दिनेश अगदी मस्त झोपतो; कारण त्याच्या घोरण्यामुळे तिलाच कधी कधी जाग येते! आता काय करावे? - तर तपासण्या!‘पॉलीसोम्नोग्राफी’ या पद्धतीने दिनेशचा मेंदू किती वेळेला त्याला उठवत होता याचे मापन केले. त्याचा मेंदू झोपला की लगेच घशाचे स्नायू शिथिल व्हायचे आणि परिणती घोरण्यात व्हायची. श्वास नलिकेतील अडथळा वाढला, की छातीच्या स्नायूंना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. एका विशिष्ट मर्यादेनंतर दिनेशचा मेंदू त्याला उठवायचा निर्णय घ्यायचा. थोडीशी जागृत अवस्था आल्यावर आपोआपच स्नायूंचा अडथळा कमी व्हायचा आणि मेंदू परत झोपेच्या अधीन व्हायचा.हे चक्र दर तासाला वीस ते पंचवीस वेळेला होत होते! अशा रीतीने ओरबाडून उठवल्यामुळे शरीरात ॲड्रेनलीनचा स्राव होतो. त्यामुळे हदयाची धडधड वाढते. काही जणांना झोपेमध्ये पॅनिक अटॅक्स येतात. त्याचे मूळ या ‘शारीरिक’ कारणात असू शकते.- पण दिनेशला मुळातच झोप लागायला प्रॉब्लेम का होता? झोप लागल्यावरच माणसे घोरतात; मग घोरण्यामुळे झोप न येणे कसे शक्य आहे? त्याचे कारण - ‘असोसिएटेड लर्निंग’ म्हणजेच चुकीची होणारी जोडणी!  घोरण्यामुळे येणारी जाग आणि पलंगावर पडलेले असणे यांची वारंवार जोडणी झाली की हळूहळू जाग म्हणजे पलंगावर पडणे असे असोसिएशन होते. त्याचा क्रम उलटा झाला की पलंगावर पडणे म्हणजे जाग अशी चुकीची जोडणी होते. निद्रानाशावरील पुढील लेखांमध्ये याबद्दल सविस्तर माहिती येईलच.

prasad.tamhankar@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्य