शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचं झाड आपल्याच दारात तर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:42 IST

तेच आपल्याला शिकवेल प्रसन्न कसं राहायचं ते..

ठळक मुद्देआपल्या सभोवती कायम पॉझिटिव्ह एनर्जी राहील यासाठी प्रयत्न करायला हवा.‘ठंडा करके खाओ..’ कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका.आपल्या गरजांवर आपलाच कंट्रोल ठेवा.

- मयूर पठाडेअनेक गोष्टींनी आपण किरकिर करतो, चिडचिड करतो, जगावर उखडतो आणि स्वत:लाच वैताग करून घेतो.. पण खरंतर प्रसन्न आणि उत्साही जगण्याचे सारे उपाय आणि युक्त्या आपल्याच हाती असतात. आपल्याला कसं जगायचंय ते आपल्याच हातात असतं. त्याची योग्य ती कृती तेवढी आपल्याला करायला हवी.काहीच अवघड नाही त्यात.. तुम्ही एकदा तशी लाईफस्टाईल जगायला सुरुवात केली की, बघा, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात कशी भरभरुन वाहायला लागेल. ती केवळ तुम्हालाच प्रसन्न करणार नाही, तर तुमच्या आजूबाजेचे लोक, वातावरणही प्रसन्न करून जाईल.काय कराल त्यासाठी?कायम आपल्या सभोवती पॉझिटिव्ह एनर्जी राहील यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं, तर ‘ठंडा करके खाओ..’ कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. कितीही राग आलेला असेल, तरी त्यावर ताबडतोब रिअ‍ॅक्ट व्हायचं नाही. प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. एक लक्षात ठेवायला हवं, आपण चुकांमधूनच जास्त शिकतो. त्यामुळे ती चूक आपली असो, किंवा इतरांची, ती आपल्याच विकासासाठी उपयोगी आहे, हे लक्षात आलं की आपोआपच त्या प्रसंगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलेल.आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे, आपल्याकडे लोकांनी कोणत्या नजरेनं बघावं असं आपल्याला वाटतं, तीच ट्रिटमेंंट आपण इतरांनाही द्यायला हवी. लोकांना तुम्ही आदरानं वागवलं, तर तुम्हालाही तशाच प्रकारची वागणूक मिळेल, हे यातलं आणखी एक सत्य.आपल्या गरजा कमी करा. गरजा कमी करा म्हणजे त्याविषयीचा हव्यास थोडा बाजूला ठेवायला हवा. त्या गरजांना आपल्यावर हावी होऊ देण्यापेक्षा सगळा कंट्रोल आपल्या हाती ठेवा.. एकदा का हा कंट्रोल आपल्या हाती आला, की काय बिशाद आहे कोणाची, आपल्याला दु:खी करण्याची?..आनंदाचं, प्रसन्नतेचं झाड चालत आपल्या दाराशी येईल..