शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सुखनिद्रा : स्मरणशक्तीचा संबंध झोपेशी असतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 09:57 IST

Happiness: खरे म्हणजे झोपेमुळे आकलन शक्ती वाढते, स्मृती बळकट होते आणि मोक्याच्या वेळेला म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना स्मरणशक्ती दगा देत नाही.

- डॉ. अभिजित देशपांडे, (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस)

रात्री जागून अभ्यास करायची सवय अनेकांना असते. परीक्षा जवळ आली की, अजिबात झोप न घेता, पूर्ण रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण किती मेहनत करतो असेच वाटते! परंतु, ऐन परीक्षेमध्ये या सवयींचा फायदा न होता उलट तोटाच होतो. २०१९ साली अमेरिकेतील जगप्रसिद्ध MIT विद्यापीठातील हुशार विद्यार्थ्यांची झोप आणि परीक्षेतील यश यांचा अभ्यास केला गेला. जरुरीपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मुलांना कमी मार्क पडल्याचे आढळले. अनेकांना असे वाटले की, यात काय नवल? कमी झोपल्याने शारीरिक अथवा मानसिक थकवा येतो आणि त्यामुळे परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होत असेल. हे उत्तर अंशतः बरोबर आहे.

खरे म्हणजे झोपेमुळे आकलन शक्ती वाढते, स्मृती बळकट होते आणि मोक्याच्या वेळेला म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना स्मरणशक्ती दगा देत नाही. झोपेचा आणि स्मरणशक्तीचा एकमेकांशी काय संबंध आहे? - हे जाणून घेण्याअगोदर आपण स्मरणशक्तीबद्दल जुजबी माहिती घेऊ या. ढोबळ मानाने आपली स्मृती अल्पकालीन (Short Term ) तसेच दीर्घ मुदतीची (Long Term) असते. अल्प मुदतीच्या स्मृतीचा उपयोग तात्पुरता  असतो. उदाहरणार्थ एखाद्याने फोन नंबर सांगितल्यानंतर लगेच तो नंबर लक्षात ठेवून लावणे! याउलट तोच नंबर दुसऱ्या दिवशी लक्षात राहण्याकरिता दीर्घकालीन स्मृतीची गरज असते. दीर्घकालीन स्मृती दोन प्रकारची असते. स्पष्ट स्मृती (Explicit) आणि विहीत किंवा अंतर्भूत (Implicit ) स्मृती. ‘‘स्पष्ट’’ स्मृती ही शब्दांमध्ये व्यक्त करता येते तर विहित स्मृती ही शब्दाने व्यक्त करणे कठीण असते. 

माझा एक वर्गमित्र जीतू. त्याला गाण्याची चाल व्यवस्थित आठवायची; पण गाण्याचे शब्द भलतेच वापरायचा. याचा अर्थ जीतूची विहित (Implicit) स्मृती म्हणजे ‘‘चाल’’ आणि ‘‘लय’’ बरोबर असली तरी स्पष्ट (Explicit) स्मृती म्हणजे ‘‘शब्द’’ योग्य नव्हती. या उलट हरीश पाठारे नामक मित्राला शब्द अचूक आठवायचे; पण चाल व्यवस्थित आठवायची नाही. एखादा प्रसंग आठवणे हे ‘‘स्पष्ट’’ स्मृतीचे उदाहरण आहे; अंतर्भूत अथवा विहित स्मरणशक्ती याचा झोपेशी काय संबंध असतो, याबाबत अधिक पुढच्या शुक्रवारी!

टॅग्स :Healthआरोग्य