शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी 3 महत्वाची औषधं स्वस्त! अशी आहेत नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:29 IST

करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे.

देशातील नागरिकांना जीवनावश्यक औषधी स्वस्त दरात मिळावी, यासाठी त्यांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण असते. आता सरकारने कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आता कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधींच्या किंमत कमी होणार आहेत. शासनाने यासंदर्भात आदेशही दिले आहेत.

देशातील आवश्यक औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्याचे काम नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) करते. आता NPPA ने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या Trastuzumab, Osimertinib आणि Durvalumab या तीन औषधांची MRP (maximum retail price) अथवा कमाल किरकोळ किंमत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

किफायतशीर दरात औषधी उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध -कॅन्सरवरील या औषधांची किंमत कमी करताना सरकारने म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक औषधी किफायतशीर किमतीत मिळत रहावेत, यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यामुळेच औषधांच्या कमाल किमती कमी करण्याचे निर्देश एनपीपीएने दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, नुकतेच या औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे. तसेच, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये या औषधांवरील कस्टम ड्युटीही रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे.10 ऑक्टोबरपासूनच नवे दर लागू - सरकारने या औषधांवरील जीएसटी दर नुकताच 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. यामुळे कंपन्यांना 10 ऑक्टोबर 2024 पासूनच एमआरपी कमी करायची होती. कारण या औषधांची नवी एमआरपी त्याच दिवसापासून प्रभावी मानली जाईल. उत्पादकांना एमआरपी कमी करून किंमतीतील बदलासंदर्भात डीलर्स, राज्य औषध नियंत्रक आणि सरकारला माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :cancerकर्करोगmedicineऔषधंCentral Governmentकेंद्र सरकार