शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘नसबंदी’ केलेले दोन कोटी मच्छर ‘गुगल’ हवेत सोडणार.. रोबोट्सच्या साहाय्यानं ‘फवारणी’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:38 IST

जगातला पहिलाच प्रयोग, भयानक आजार आणि साथीच्या रोगांना अटकाव घालण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देजगातला पहिलाच प्रयोगझिका व्हायरस, डेंग्यू, चिकनगुनिया.. यासारख्या रोगांना अटकाव घालण्याचा प्रयत्नप्रयोगशाळेतले हे डास माणसांना चावणार नाहीत.

- मयूर पठाडेसाला एक मच्छर.. या मच्छरांना आता करावं तरी काय? काहीही करा, कोणतेही उपचार करा, अगरबत्ती जाळा, नाहीतर घराचाच पार धूर करून टाका, पण हे डास काही घरातून निघायचं नाव घेत नाहीत! अख्ख्या जगातच त्यांनी पार उच्छाद मांडलाय..झिका व्हायरस, डेंग्यू, चिकनगुनिया.. यासारख्या एकापेक्षा एक खतरनाक रोगांचा प्रसार करून माणसाची जगातील संख्या कमी करण्याचं ध्येयच जणू या मच्छरांनी हाती घेतलं आहे. काही केल्या त्यांच्यावर कंट्रोल करणं माणसाला शक्य होत नाहीए..आता करावं तरी काय? कसे घालवावेत हे मच्छर? हे मच्छर मारण्यासाठी जगातलं सर्वात बलाढ्य सर्च इंजिन गुगलनंच आता पुढाकार घेतला आहे. आपल्या या मोहिमेला त्यांनी नाव दिलं आहे ‘डिबंग प्रोजेक्ट’!‘अल्फाबेटस’ या गुगलच्या पॅरेंट कंपनीची ‘फ्रेस्नो’ ही सायन्सच्या संदर्भातील उपकंपनी. तिनं हा उपक्रम हाती घेतला आहे.

‘काट्यानं काटा काढावा’ तसाच हा प्रयोग आहे. मच्छरांची पैदास थांबवण्यासाठी मच्छरांचाच उपयोग केला जाणार असून त्यासाठी रोबोट्सचा उपयोग केला जाणार आहे.जगातला अशा प्रकारचा हा पहिलाच आणि सर्वात अभिनव असा उपक्रम आहे. त्यासाठी कंपनीनं अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील फ्रेस्रो हा भाग त्यासाठी निवडला आहे. एकूण दोन टप्प्यात हा प्रयोग होईल. पहिल्या टप्प्यात ३०० एकर आणि दुसºया टप्प्यात ३०० एकर जागेत ही चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर त्याचं फलित तपासलं जाणार आहे.

‘मच्छर मारण्याचा’ काय आहे हा प्रयोग?१- प्रयोगशाळेत तयार केलेले तब्बल दोन कोटी नर मच्छर या परिसरात सोडण्यात येतील.२- या साºयाच मच्छरांची पुनरुत्पादनाची क्षमता नष्ट केलेली असेल.३- मादी डासांबरोबर या मच्छरांचा संयोग झाल्यानंतर अंडी फलित होणार नाहीत आणि मच्छरांचीही निर्मिती होणार नाही.४- हे डास माणसांना चावणारे नसतील असं कंपनीचं म्हणणं आहे.५- डेंग्यूचा प्रसार करणारे इडिस इजिप्ती डास २०१३मध्ये जगात सर्वप्रथम कॅलिफोर्निया येथे आढळले होते.६- परिसरात मच्छर सोडण्याचा हा उपक्रम सुमारे पाच महिने चालणार आहे.७- या मच्छरांची ‘फवारणी’ करण्यासाठी रोबोट्सचा वापर केला जाणार आहे.८- यानंतर या प्रयोगाचं मूल्यमापनही केलं जाणार आहे.९- या उपक्रमाला सुरुवातही झाली आहे..१०- हा उपक्रम यशस्वी होईलच अशी कंपनीला खात्री असून जगभरात या उपक्रमांची पुनरावृत्ती केल्यास मच्छरांच्या त्रासातून सुटण्यासाठी आणि मच्छरमुक्तीसाठी याचा मोठा उपयोग होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे.प्रयोगशाळेतले हे डास माणसांना चावणार नाहीत.