शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

१० वर्षे वयाच्या आत मासिक पाळीने नंतर होतो घात; अमेरिकन संशोधनातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 07:26 IST

अभ्यासात सहभागी झालेल्या महिला राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षण १९९९-२०१८ मधून आल्या होत्या.

नवी दिल्ली : वयाच्या १३ व्या वर्षाच्या अगोदरच मासिक पाळी सुरू झालेल्या मुलींना मध्यम वयातच मधुमेहाचा धोका वाढत असल्याचे समोर आले. ब्रिटिश मेडिकल नियतकालिक (बीएमजे) ‘न्यूट्रिशन, प्रिव्हेन्शन अँड हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. संशोधनानुसार, विशेषत: ज्यांना वयाच्या १० वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होते, त्यांना ६५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मधुमेह, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.  संशोधनात २० ते ६५ वर्षे वयोगटातील १७ हजार महिलांचा समावेश होता.

हार्ट अटॅकचा धोका दुप्पट१० वर्षांपूर्वी मासिक पाळी आल्याने ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या स्त्रियांना कमी वयात मधुमेह होतो त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढतो. हे प्रमाण ६० टक्के इतके अधिक असते, असेही संशोधनात समोर आले आहे.

नेमका संबंध काय याची कारणे मिळेनात

अमेरिकेतील टुलेन युनिव्हर्सिटी आणि ब्रिघम अँड वूमेन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी सांगितले की, प्रायोगिक अभ्यास असल्याने त्यांना मासिक पाळीचा मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यामागील कारणे शोधता आली नाहीत.

अभ्यासात सहभागी झालेल्या महिला राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षण १९९९-२०१८ मधून आल्या होत्या. संशोधनातील महिलांनी त्यांची पहिली मासिक पाळी कोणत्या वयात सुरू झाली हे त्यात नमूद केले होते.

 १० वर्षे किंवा त्यापूर्वी मासिक पाळी सुरू झालेल्या ३२ % महिलांना टाइप २ मधुमेह होता. ११ व्या वर्षी मासिक पाळी आलेल्या १४ % महिलांना टाइप २ मधुमेह होता. १२ व्या वर्षी मासिक पाळी सुरू झालेल्या २९ % महिलांना टाइप २ मधुमेह होता.