पोटाच्या तक्रारींना करा बाय बाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:41 IST
बहुतेक शारीरिक व्याधी ह्या पोटाच्या तक्रारींपासून सुरू होतात. जेवणाच्या अनियमित सवयी शिवाय बाहेरचे खाणे तसेच व्यवस्थित चर्वण न करता खाणे आदी कारणांनी पोटाच्या समस्या उद्भवतात.
पोटाच्या तक्रारींना करा बाय बाय !
बहुतेक शारीरिक व्याधी ह्या पोटाच्या तक्रारींपासून सुरू होतात. जेवणाच्या अनियमित सवयी शिवाय बाहेरचे खाणे तसेच व्यवस्थित चर्वण न करता खाणे आदी कारणांनी पोटाच्या समस्या उद्भवतात. पोटाच्या तक्रारींमुळे निरोगी व्यक्तीलासुद्धा पोटदुखी किंवा पोट साफ न होणे अशी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, काही घरगुती उपाययोजना केल्यास पोटाच्या तक्रारींना बाय बाय करु शकतो. बऱ्याचदा खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटात गॅसेस होतात. अशावेळी कपभर पाण्यात एक लिंबू व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका. सोडा पूर्णपणे मिक्स करा. हे पाणी पिल्याने गॅसपासून आराम मिळेल. हर्बल टी गॅस प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी उपयोगी आहे. सकाळी व संध्याकाळी हर्बल टी घेतल्याने गॅस प्रॉब्लेम कमी होईल. हळदीच्या पानांची पेस्ट करून ही पेस्ट दुधात मिसळून घ्या. गॅस दूर करण्याची ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. भरपूर पाणी पिल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होऊ शकतात. दिवसभरात कमीत कमी ६ ते ८ ग्लास पाणी प्या. जेवणानंतर आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. थेट आले खाणे शक्य नसेल तर भाज्यांमध्ये आल्याचा समावेश करा. बटाट्याचा रस काढून जेवणापूर्वी घ्या. लवकर आराम होण्यासाठी असे दिवसातून तीन वेळा करा.