‘या’ सोप्या टिप्सने ताणतणाव करा दूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:16 IST
तणावाने मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मग या तणावाला कमी करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न का करू नये, त्यासाठी पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब करा.
‘या’ सोप्या टिप्सने ताणतणाव करा दूर !
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आज प्रत्येकाच्या आयुष्यावर दिसून येत आहे. कामाचा व्याप, धावपळ, कौटुंबिक समस्या, व्यक्तिगत आयुष्यातील अडचणी आदी कारणाने प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जीवन जगत आहे. प्रत्येकाचा दिवस तणावानेच सुरु होतो आणि तणावातच संपतो. याचाच परिणाम मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मग या तणावाला कमी करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न का करू नये, त्यासाठी पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब करा.* नेहमी काम करावे, कामाची चिंता करत बसू नये. कामाची योग्य योजना तयार करावी आणि कामाला सुरवात करावी. एखादे काम पूर्ण होत नसेल तर अधिक प्रयत्न करावेत.* न मागता कुणालाही सल्ला देऊ नये, तसेच आपलेच खरे अशा आविभर्वात वागण्याचा प्रयत्न करू नये.* मुलांवर अवश्य नजर ठेवावी, परंतु मुलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये.* गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.* गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.* आजारी पडल्यास औषधे वेळेवर घ्यावीत, तसेच आजारपणाबाबत जास्त चिंता करू नये.* मित्र किवां नातेवाईकांवर संकट आल्यास शक्य होईल तेवढी मदत अवश्य करावी. परंतु तुमच्या हातात काहीच नसेल तर केवळ विचार करून त्यामध्ये वेळ घालवू नये.* होणारी गोष्ट होतेच आणि न होणारी गोष्ट कितीही प्रयत्न केला तरीदेखील होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. * तणाव दूर करण्याचा संगीत ऐकणे हा देखील चांगला पर्याय आहे. जेव्हा तणावात असाल तेव्हा आपल्या आवडीचे संगीत ऐका. याने मनाचा थकवा तर दूर होईल शिवाय तणावदेखील कमी होण्यास मदत होईल.