शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट शोध! आता सुईशिवाय दिली जाणार लस; दुखणार तर नाहीच, नर्सचीही गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 21:35 IST

सुईचा फोबिया असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार; सुईशिवाय लस दिली जाणार

नवी दिल्ली: भविष्यात इंजेक्शनच्या माध्यमातून होणाऱ्या वेदनांपासून सुटका होऊ शकते. लवकरच सुईशिवाय लस देता येईल. विशेष म्हणजे हे इंजेक्शन आताच्या इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी असेल. अनेकांना लस, औषधं घ्यायचं असतं. मात्र त्यांच्या मनात सुईबद्दल भीती असते. सुई टोचल्यामुळे होणारी वेदना त्यांना नको असते. त्यासाठी आता सुईशिवाय इंजेक्शन देण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान आता एका निर्णायक टप्प्यावर आहे.

शास्त्रज्ञांनी एक लहानशी थ्रीडी प्रिंटेड मायक्रोनेडल लस विकसित केली आहे. ही लस भविष्यात सुईला पर्याय ठरेल. कॅलिफॉर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठानं यावर संशोधन केलं आहे. या तंत्रज्ञानाची उंदरांवर चाचणी घेण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरानंतर रोगप्रतिकाशक्तीवर दिसून आलेला प्रभाव इंजेक्शनच्या तुलनेत १० पटीनं अधिक आहे. टीसी आणि अँटिजन स्पेसिफिक अँटीबॉडीच्या बाबतीत हाच प्रभाव ५० पटीनं जास्त आढळून आला.

डॉक्टर, नर्सची गरज नाहीथ्रीडी प्रिंटेड मायक्रोनेडल लस देण्यासाठी नर्स किंवा डॉक्टरांची गरज भासणार नाही. गरज असेल तेव्हा कोणतीही व्यक्ती अतिशय सहजपणे ही लस घेऊ शकेल. सुईच्या तुलनेत वेदना कमी असेल. एका लहानशा पॅच स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या या लसीमध्ये डोसची आवश्यकता कमी असेल. सुईची भीती असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. उंदरांवर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली असली, तरी अद्याप माणसांवरील चाचणी शिल्लक आहे.

लस कशी काम करणार?पॉलिमर मायक्रोनेडल व्हॅक्सिन पॅच एका क्लिप प्रोटोटाईप थ्रीडी प्रिंटरच्या मदतीनं प्रिंट केली जाते. मायक्रोनेडल्सला व्हॅक्सीन फ्लूडसोबतही कोट केलं जातं. लस शरीरात गेल्यानंतर फ्लूड विरघळून जाईल. या लसीच्या माध्यमातून औषध मांसपेशीपर्यंतही पोहोचवता येतं.