शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

FITNESS : ​पावसाळ्यात फिटनेससाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 8:00 AM

फिटनेससाठी कोणत्या ऋतूत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे बऱ्याचजणांना माहित नसते. त्यामुळे फायद्या ऐवजी नुकसानच होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सेलिब्रिटी आणि फिटनेस जणू समिकरणच झालं आहे. फिटनेससाठी प्रत्येक सेलिब्रिटी आग्रही असतो. विशेष म्हणजे फिटनेस त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भागच झाला आहे. त्यांचेच अनुकरण करुन आजची तरुणाईदेखील फिटनेस टिकविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र बऱ्याचदा फिटनेससाठी प्रयत्न करुनही अपेक्षित फायदा होत नाही. काही तज्ज्ञांच्या मते, ऋतूमानानुसार फिटनेसाठीच्या पद्धतीत बदल असणे आवश्यक आहे. मात्र फिटनेससाठी कोणत्या ऋतूत कशा प्रकारे काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे बऱ्याचजणांना माहित नसते. त्यामुळे फायद्या ऐवजी नुकसानच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या सदरात आम्ही आपणास पावसाळ्यात फिटनेससाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याबाबत सांगणार आहोत. फिटनेससाठी प्रतिबद्धता आणि समर्पण खूपच महत्त्वाचे असते. यासाठी पावसाळ्यातदेखील फिटनेससाठी तेवढेच आग्रही असावे. तज्ज्ञांच्या मते, घराच्या आतदेखील आपण नॉर्मल वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवू शकतो. मात्र आपले शरीर जलप्रतिरोधी असल्याने आऊट डोअर रनिंगदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. घराबाहेर जाऊन व्यायाम केल्याने आपले मेटाबॉलिज्म सक्रिय होतो आणि आपणास भरपूर ऊर्जा मिळून आपण फिट होतो.    मात्र आपणास पावसाळ्यात बाहेर जाऊन व्यायाम करायचा नसेल तर घरात स्क्वॅट, पुशअप, प्लांक यासारखे व्यायाम प्रकार ३० ते ४० मिनिटांपर्यंत करु शकता. त्यात स्ट्रेचिंग, नंतर पाच मिनिट स्पॉट जॉगिंग, पंधरा मिनिट कार्डियो करु शकता. यामुळे ह्रदयाची स्पंदने वेगाने वाढतील आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होईल. याशिवाय दोरी उड्या, पायऱ्यांचा चढ-उतार, जागेवरच्या उड्या आदी व्यायाम करू शकता. यामुळे शरीराच्या मांसपेशी तर मजबूत  होतातच शिवाय सांधेदेखील स्ट्रॉंग होतात. आपण या ऋतूत योगा करूनही फिट राहू शकता. तसेच डान्स वर्क आऊटचाही प्रयोग करु शकता.व्यायामादरम्यान योग्य कपडे, शूज आणि एसेसरीजचा वापर करणेदेखील आवश्यक आहे.  या दिवसात शरीराला विटॅमिन्सची आवश्यकता भासते. म्हणून व्यायामाबरोबरच ऋतूनुसार उपलब्ध असणारे विटॅमिनयुक्त फळे आणि भाजीपालांचेही सेवन करावे. यामुळे शरीरास ऊर्जा मिळून संक्रमणापासून बचाव होतो.Also Read : HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?