Fitness : स्लिम आणि फिट राहण्यासाठी करा भरपूर नाश्ता !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:24 IST
एका नव्या संशोधनानुसार, भरपूर नाश्ता केल्याने वजन कमी होऊन आपण स्लिम होऊ शकतो असे आढळून आले आहे.
Fitness : स्लिम आणि फिट राहण्यासाठी करा भरपूर नाश्ता !
स्लिम आणि फिट राहणे हे सेलिब्रिटींना आवश्यक असते. त्यासाठी त्यांचा डायट प्लॅनही ठरलेला असतो. विशेष म्हणजे आपले वजन वाढू नये, आपण स्लिम आणि फिट दिसावे यासाठी ते भरपूर नाश्ता करतात. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम बहुतांश लोकांवरही दिसून येत असल्याने वजन वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. वजन कमी करून स्लिम आणि फिट राहण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात, मात्र फारसा फरक पडत नाही. एका नव्या संशोधनानुसार, भरपूर नाश्ता केल्याने वजन कमी होऊन आपण स्लिम होऊ शकतो असे आढळून आले आहे. सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात करणे, दुपारचे जेवण हलके, रात्रीचे जेवण टाळणे, अधेमधे खाणे टाळणे व रात्रभर काहीही न खाणे या गोष्टींमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. असे कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या हॅना कोलेवा यांनी सांगितले. राजाप्रमाणे नाश्ता करा, राजकुमाराप्रमाणे दुपारचे जेवण व गरीबाप्रमाणे रात्रीचे जेवण करायला हवे. जर्नल आॅफ न्युट्रिशनमध्ये प्रकाशित या संशोधनात ५० हजार लोकांचे परीक्षण करण्यात आले. सकाळी पोटभर नाश्ता केल्याने आपणास दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. यासोबतच आपला बॉडी मास इंडेक्स (इटक) संतुलित राहतो. असे एका संशोधनात आढळले आहे.दिवसातून तीन वेळा खाणारे व रात्रीचे जेवण भरपूर घेणाऱ्यांना बीएमआय वाढतो आणि यामुळे विविध आजारांचा धोकाही वाढतो. वयाची साठी पूर्ण होण्यापूर्वी जे लोक नाश्त्यात भरपूर कॅलरीज घ्यायचे व दिवसभर फार हलके जेवण घ्यायचे त्यांना वजन वाढण्याचा त्रास फरसा जाणवला नसल्याचे या संशोधनात आढळले. साठीनंतर आहाराच्या याच पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांमध्ये सामान्य प्रमाणापेक्षा अधिक वजन कमी झाल्याचे दिसून आले. Also Read : HEALTH : दुपारच्या जेवणानंतर ‘या’ चुकांमुळे वाढते वजन ! : Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !