शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

​Fitness : ‘सिक्स पॅक्स’बनविण्यासाठी "हा" आहे अगदी सोपा व्यायाम प्रकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:11 IST

सिक्स पॅक्स बनविण्यासाठी जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम शिकविले जातात. त्यातील एक अगदी सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार म्हणजे ‘प्लँक’ होय.

आपल्या आवडत्या अभिनेत्यासारखे ‘सिक्स पॅक्स’ आपलेही असावेत असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यानुसार तरुणांकडून तसे प्रयत्नही केले जातात. सिक्स पॅक्स बनविण्यासाठी जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम शिकविले जातात. त्यातील एक अगदी सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार म्हणजे ‘प्लँक’ होय.  हाताची कोपरे आणि पावले, यांच्यावर शरीराचा संपूर्ण भार तोलण्याला ‘प्लँक’ म्हणतात. यामुळे पोटाच्या स्नायूंचे टोनिंग होऊन पोटावरील अतिरिक्त चरबी नाहीशी होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील इतर अवयवांनाही प्लँक मुळे लाभ होतो.प्लँक मुळे पायांना चांगला आकार मिळण्यास मदत होते. प्लँक केल्याने कंबरेपासून ते पावलांपर्यंत सर्वच स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. हे स्नायू सक्रीय होऊन त्यांच्यावरील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. परिणामी आपले पाय बळकट दिसू लागतात. प्लँक चा सर्वात जास्त परिणाम जाणवतो, तो पोटाच्या स्नायूंवर. या व्यायामप्रकारामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सक्रीय होतात. तसेच पोटावरील जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील नियमित प्लँक केल्याने कमी होते.प्लँक केल्याने शरीराचा मेटाबोलिक रेट वाढून शरीरातील कॅलरीज त्वरेने खर्च केल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. व्यायाम करणे थांबविल्याच्या पुष्कळ वेळानंतर पर्यंत कॅलरीज खर्च होत राहतात, इतका हा व्यायामप्रकार प्रभावी आहे. प्लँक केल्याने शरीराचे पोश्चर सुधारण्यास ही मदत मिळते. नियमित प्लँक केल्याने स्नायूंची लवचिकता वाढते. प्लँक या व्यायामप्रकाराने संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. हाताच्या पंजांवर आणि पावलांवर शरीराचा भार तोलूनही प्लँक करता येतो. या व्यायामाने बाकी शरीराबरोबर हाताचे आणि खांद्यांचे स्नायू व सांधे बळकट होण्यास मदत मिळते. ज्या व्यक्तींना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी प्लँक नियमित, पण थोड्याच वेळाकरिता करावा. एका वेळेला वीस ते तीस सेकंद प्लँक करावे. तीस सेकंद प्लँक करून मग काही क्षणांची विश्रांती घ्यावी, आणि परत वीस सेकंद प्लँक करावा. असे चार ते पाच वेळा केल्याने लाभ होतो.Also Read : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !                    : Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !