सणासुदीत असे रहा फिट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:16 IST
कोणताही सण-उत्सव असो, आपण आनंदित असायला हवे. त्यातच आपले आरोग्य सुदृढ असेल तर आपल्या आनंदाला तर सीमाच राहत नाही, मात्र बऱ्याचदा आपले आरोग्य ऐन सणासुदीत ढासळते आणि आपल्या आनंदावर विरजण पडते. असे होऊ नये म्हणून आपण कसे फिट राहू याबाबत काही टिप्स...
सणासुदीत असे रहा फिट !
कोणताही सण-उत्सव असो, आपण आनंदित असायला हवे. त्यातच आपले आरोग्य सुदृढ असेल तर आपल्या आनंदाला तर सीमाच राहत नाही, मात्र बऱ्याचदा आपले आरोग्य ऐन सणासुदीत ढासळते आणि आपल्या आनंदावर विरजण पडते. असे होऊ नये म्हणून आपण कसे फिट राहू याबाबत काही टिप्स...* रोज किमान ३० मिनिट पायी फिरणे आणि आवश्यक प्रमाणात पाणी पिणे ही सवय आपणास फिट राहण्यास खूप मदत करेल. * ध्यानधारणेबरोबरच व्यायाम करायला विसरु नये. सण-उत्सव असले तरी जास्त प्रमाणात मिठाई खाणे टाळावे. बाहेरील तळलेले पदार्थ तर मुळीच खाऊ नये. यामुळे आपले आरोेग्य धोक्यात येऊ शकते.* जेवणादरम्यान कदापी मद्यपान करू नये. यामुळे शरीरात चरबी जमा होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त पौष्टिक आहार घ्या. * कॅलरीयुक्त खाणे टाळावे. नातेवाईकांकडे जाणार असाल तर घरून काहीतरी खाऊन जा, जेणेकरून आपणास तीव्र भूक लागणार नाही. * आपल्या घरीच पोेषणयुक्त आहार खा. तसेच फ्रीजमध्ये ताज्या आणि हिरव्या भाजीपाला ठेवा. सणात आपले आरोग्य स्वस्थ ठेऊनच आपण आपल्या परिवारासोबत भरपूर मौज-मस्ती करू शकता.* पाण्यामुळे आपली पचनक्रियाबरोबर रक्ताभिसरण क्रियादेखील चांगली राहते. तसेच अतिरिक्त कॅलरीदेखील कमी करण्यास मदत होते. रोज १०-१२ ग्लास पाणी पिल्याने आपण स्वस्थ राहणार आणि आपल्या चेहऱ्यावरदेखील चमक दिसेल.