शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरं सांगा, अधूनमधून तुमच्याही पायांची दुर्गंधी येतेच ना?

By admin | Updated: June 14, 2017 18:14 IST

नात्यांत त्यामुळे दुरावा निर्माण होतोच. हे ६ उपाय करा आणि चिंतामुक्त व्हा

- मयूर पठाडेखरं सांगा, तुमच्या पायांचा कधीकधी घाणेरडा वास येतो की नाही? विशेषत: उन्हाळ्यात आणि पावसाळ्यांत. अनेकांना हा त्रास असतो, पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या आजूबाजूला जी माणसं असतात, त्यांना या घाण वासाचा जास्त त्रास होतो. कधी या माणसापासून आणि या वासापासून लांब जातो असं त्यांना होतं.आताही पावसाळ्याची सुरुवात आहे आणि अनेकांना या अनुभवाला सामोरं जावं लागेल. पण थोडी काळजी घेतली तर या नकोशा अन् त्रासदायक अनुभवातून तुमची सुटका होऊ शकेल आणि इतरांना तुमच्यापासून लांब जावंसं, पळावंस वाटणार नाही. पायांचा वास घालवण्यासाठी काय कराल?

 

१- तुम्ही जर मद्यसेवन आणि धुम्रपान करीत असाल, तर ते ताबडतोब बंद करा किंवा त्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल तितकं कमी करा. २- मद्य आणि धुम्रपानामुळे काही विषारी पदार्थ तुमच्या शरीरात जातात. या विषारी घटकांचाही अतिशय घाण, उग्र दर्प येतो.३- पाय दररोज न चुकता आणि येताजाता स्वच्छ धूत जा. त्यासाठी पायावर नुसतं पाणी टाकणं किंवा ते चोळून धुणं पुरेसं नाही. अ‍ॅँटिबॅक्टेरिअल साबणानं आपले पाय दिवसातून किमान दोन वेळा तरी धुतलेच पाहिजे.

 

३- व्हिनेगार बाथ- एक भाग पाणी आणि दोन भाग व्हिनेगारच्या मिश्रणात काही वेळ पाय बुडवून ठेवा. त्यामुळे बॅक्टेरियाचा नाश होईल आणि पायांचा वासही येणार नाही.४- सॉल्ट वॉश- अर्धा कप मीठ आणि चार कप पाणी यापासून बनवलेल्या मिश्रणात रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून बसा. पायांचा वास येणं बंद होईल. ५- बेकिंग सोडा- बेकिंग सोडा, कॉर्न स्टार्च आरारुट पावडरनं पाय रोज स्वच्छ धुतले तर मॉइश्चर कमी होण्यास मदत होईल आणि पायांच्या दुर्गंधीपासूनही बचाव होईल. ६- सॉक्स- पायांचा, सॉक्सचा वास येतो, म्हणून सॉक्सचं घालायचे नाहीत, असा वेडेपणा कधीच करू नका, उलट त्याची मोठीच किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. किमान पावसाळ्यात तरी रोज सॉक्स घालणं गरजेचंच आहे. एक काळजी मात्र अवश्य घ्या.. रोज स्वच्छ आणि धुतलेले सॉक्स घालणं आवश्यक आहे. तर पायाच्या दुर्गंधीचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकेल.