शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नेमकं झोपायचं तरी किती वेळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:44 IST

शास्त्रज्ञ सांगतात, जास्त झोपलात तरी प्रॉब्लेम आणि कमी झोपलात तर त्याहून प्रॉब्लेम!

ठळक मुद्देशास्त्रज्ञ सांगतात, तुम्ही जास्त किंवा कमी झोपत असलात, तरी त्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम आहेत.पण जे कमी झोपतात, त्यांच्यावर होणाºया दुष्परिणामांची तीव्रता मात्र जास्त आहे.‘द सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या संस्थेनं या संदर्भात व्यापक अभ्यास केला आहे.

- मयूर पठाडेझोपेचं आपल्या आरोग्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, हे एव्हाना आपल्या साºयांनाच माहीत आहे. झोप तर प्रत्येकाला आवश्यक, पण किती तास झोपायचं? झोपेचं योग्य प्रमाण काय, हे मात्र फारसं कुणालाच माहीत नसतं.यामुळेच यासंदर्भात शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं आणि शोधून काढलं नेमकं किती तास झोपायचं ते! कमी आणि जास्त झोपेमुळे आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो ते!काय आहे हे संशोधन?मुळात आपली झोप का उडते हे पाहणंदेखील आवश्यक आहे. अनेक कारणं. कोणाची टेन्शनमुळे झोप उडते, कुणाची अति कामामुळे झोप उडते तर कुणाची प्रेमात पडल्यामुळे. याउलट परिस्थिती म्हणजे अनेकांना झोपेची इतकी आवड असते की तासन्तास ते झोपू शकतात. त्यांची ही कुंभकर्णी झोप त्यांना कितीही महत्तवाचं काम असलं तरी त्याच्या आड येत नाही.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, तुम्ही कमी झोपत असाल तरीही ते तुमच्या आरोग्यासाठी वाईट आणि जास्त झोपत असाल तरीही ते वाईटच. त्यासाठी त्यांचा सल्ला आहे, प्रत्येकानं रोज सात ते नऊ तास एवढी झोप घेतली पाहिजे. त्यापेक्षा फार कमीही नको आणि जास्तही नको.महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त किंवा कमी झोपत असलात, तरी त्यामुळे तुमच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. पण जे कमी झोपतात, त्यांच्यावर होणाºया दुष्परिणामांची तीव्रता मात्र जास्त आहे.‘द सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या संस्थेनं या संदर्भात व्यापक अभ्यास केला.काय आहेत कमी आणि जास्त झोपेचे दुष्परिणाम?झोपेच्या अनियमिततेमुळे आणि कमी-जास्त झोपेमुळे सर्वात महत्त्वाचा त्रास होतो तो हृदयाला. त्यामुळे हृदयविकार बळावतो. हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता वाढते, डायबेटिस तुमच्या शरीरात घर करू शकतो, याशिवाय लठ्ठपणा, वजनवाढ आणि मानसिक त्रासानंही तुम्ही त्रस्त होऊ शकता.त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आपली झोप ‘योग्य’ तेवढीच ठेवा आणि आपलं आरोग्यही सुदृढ राखा.