शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:07 IST

आरोग्य विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात आणि राज्यात ‘जेएन-१’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यामुळे कोरोना पसरण्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या नवीन व्हेरिएंटच्या अनुषंगाने अजिबात घाबरण्याची गरज नाही. संबंधित प्रकारचे रुग्ण आढळत राहतील. ते बरेही होतील. मात्र, नागरिकांनी जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतली पाहिजे, सतर्क राहिले पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  

आरोग्य विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार आहे किंवा लाट येणार आहे, असे नव्हे. आरोग्य यंत्रणा कुठल्याही येणाऱ्या संकटाला सज्ज राहावी म्हणून तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी उगाच भीती बाळगू नये आणि भीती पसरवू नये. जीवनशैली उत्तम ठेवल्यास कोणताही आजार होणार नाही. 

राज्यात १९, तर मुंबईत ८ नवीन रुग्ण   राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत.  राज्यात कोविडचे ६८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३४ रुग्ण मुंबई, १४ ठाण्यात, तर रायगडमध्ये ४ रुग्ण उपचार घेत आहेत.   शुक्रवारी राज्यात १९ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  मुंबई - ८, ठाणे पालिका क्षेत्र -४, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र -१,  रायगड-१, पुणे पालिका क्षेत्र-१, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र-२ , सांगली मिरज कुपवाड पालिका क्षेत्र -२, छत्रपती संभाजीनगर - २. 

 सिंधुदुर्गमधील रुग्ण पूर्णपणे बरा  सिंधुदुर्गात जेएन-१ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असून, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. जेएन-१ हा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे. यात रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत.  मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यात नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नववर्षाच्या स्वागतानिमित्त पुढील आठवड्यापासून सर्वत्र गर्दी वाढण्याची चिन्हे असल्याने त्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. मास्क लावल्यास फायदा होईल. सिंधुदुर्गात जेएन-१ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असला तरी या व्हेरिएंटची लक्षणे फारच सौम्य आहेत. त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही. जास्त विचार करण्यासारखी परिस्थिती नाही.- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय

सार्स, स्वाइन फ्लू  या आजाराच्या साथी आपल्याकडे मागे येऊन गेल्या आहेत. वर्षभरात या आजाराचे काही रुग्ण आढळतात. त्यामुळे कोरोनाचे काही व्हेरिएंटचे रुग्ण आढळत राहतील. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आपल्याकडे सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात आहेत. आपण आणखी काही सूचना दिल्या आहेत. उगाचच केरळमध्ये काही तरी उपप्रकार आला म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या