शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

एनर्जी ड्रिंकपासून खरंच एनर्जी मिळते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:54 IST

तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते किंवा लागू शकतं हृदयाचं दुखणं!

ठळक मुद्देएनर्जी ड्रिंक्स सातत्यानं घेण्यानं तुमच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि तुमचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं.अ‍ॅथलिट्सना या एनर्जी ड्रिंकचा सर्वात जास्त तोटा सहन करावा लागतो. कारण झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तेच जास्त प्रमाणात या ड्रिंक्सचा वापर करतात.

- मयूर पठाडेएनर्जी ड्रिंक तुम्ही घेता? अधूनमधून तरी नक्कीच घेत असाल. त्यानं कसं मस्त फ्रेश वाटतं. डोक्याला कशी एकदम तरतरीच येते. हो ना? त्यात तुम्ही जर अ‍ॅथलिट असाल, व्यायामपटू असाल, वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेत असाल, रनिंग, सायकलिंग, स्वीमिंग.. अशा वेळी तर ही एनर्जी ड्रिंक तुमच्यासाठी मोठा सहाराच असतात. आपला झालेला एनर्जी लॉस झटपट भरून काढण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करीत असाल. तुमचे प्रशिक्षकही बºयाचदा तुम्हाला ही अशी एनर्जी ड्रिंक्स घेण्यासाठी सजेस्ट करीत असाल.. हे घेण्यानं तुम्हाला नक्कीच मस्त वाटत असेल, पण ही एनर्जी ड्रिंक्स घेण्यापूर्वी किमान दहा वेळा विचार करा..ही एनर्जी ड्रिंक्स सातत्यानं घेण्यानं तुमच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि तुमचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं. त्यामुळे जे कोणी एनर्जी ड्रिंक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतील, त्यांनी सावधान! त्यांनी तातडीनं आपली ही सवय आटोक्यात आणावी, शक्य झालं तर लवकरात लवकर सोडावी आणि एनर्जी लॉस भरून काढायचाच असेल तर त्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.अ‍ॅथलिट्सना या एनर्जी ड्रिंकचा सर्वात जास्त तोटा सहन करावा लागतो. कारण झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तेच जास्त प्रमाणात या ड्रिंक्सचा वापर करतात.यासंदर्भातलं संशोधन नुकतंच ‘फ्रंटियर्स’ या जगप्रसिद्ध आरोग्य मासिकात प्रसिद्ध झालं आहे.यापेक्षाही आणखी एक धोकादायक बाब संशोधकांच्या निदर्शनास आली आहे ती म्हणजे काही जण एनर्जी अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून ते पितात. असं करणं तर अत्यंत धोकादायक आहे आणि त्यापासून सगळ्यांनी लांब राहावं असा कळकळीचा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.