शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Doctors Day: कोरोनाग्रस्तांसाठी डॉक्टर्स बनले देवदूत; २४ तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:43 IST

देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे.

नामदेव मोेरेनवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी गेले ११० दिवस येथील डॉक्टर्स अविरतरपणे काम करत आहेत. मनपा व खासगी रुग्णालयात अनेक कर्तव्यदक्ष डॉक्टर्स सुट्टी न घेता अनेक जण १० ते १५ तास परिश्रम करत आहेत. ते घेत असलेल्या मेहनतीमुळेच आतापर्यंत ३,७५४ जण कोरोनामुक्त झाले आहे.

देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे. नवी मुंबईमध्येही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांविषयी आदर वाढू लागला आहे. शहरात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यावर पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्य आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी सर्व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी साप्ताहिक सुट्टी वगळता सलग ११० दिवस सुट्टी न घेता अथकपणे डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांना त्यांच्या घरात, इमारतीमध्ये व परिचितांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. एवढेच काय तर,रू ग्णांना त्यांच्या नातेवाइकांनाही भेटता येत नाही. या काळात हे डॉक्टरच त्यांचा आधारवड झाले. चोवीस तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांची धडपड ही कायम लक्षात राहील अशी आहे.

या काळात अनेक गरोदर महिलांची बाळंतपण झाली. त्यातल्या अनेकींना लागण झाली. त्यांची प्रसूती उत्तम करण्यासाठी डॉक्टरांनी श्रम घेतले. घणसोलीमधील महिलेला कोरोनाची लागण झाली होती तेव्हा, नवी मुंबई पालिकेतील डॉक्टर्सच्या टीमने हे आव्हान स्वीकारून तिची मनपा रुग्णालयात प्रसूती करून दोघांचेही जीव वाचविले होते. मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये फ्लू क्लिनिक सुरू झाल्यानंतर तर, ताप, सर्दी, खोकला झालेल्यांना कोरोना होत नाही, हे डॉक्टरांनी कृतीतून दाखवून दिले. यामुळे खासगी क्लिनिक सुरू होण्यास मदत झाली आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनीही चांगली सेवा दिली.तुर्भे पॅटर्न राबविण्यात मोलाची भरनवी मुंबर्ईची धारावी अशी ओळख असलेल्या तुर्भे स्टोअर परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला होता. नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये एकाच दिवशी २९ रुग्णही सापडले होते, परंतु डॉ. कैलास गायकवाड व इतर सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी आव्हान स्वीकारून, येथील रुग्णवाढ रोखण्यात यश मिळवून तुर्भे पॅटर्न तयार केला. आज या तुर्भे पॅटर्नकडे आदराने पाहिले जाते.

टॅग्स :doctorडॉक्टरNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या