प्रवासाला जायचं का? पॅकिंग करण्याआधी या टिप्स वाचाच. प्रवासात मनस्ताप अजिबात होणार नाही!
By Admin | Published: June 22, 2017 04:40 PM2017-06-22T16:40:11+5:302017-06-22T16:40:11+5:30
उत्तम पॅकिंग हा प्रवासाचा बेसिक मंत्र आहे. पण या पॅकिंगसाठी काय करावं हे जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं ते काय करु नये हे लक्षात ठेवून पॅकिंग करणं.
- अमृता कदम
सुट्टीवर जाताना उत्तम पॅकिंग करणं ही खरंतर एक कलाच आहे. त्यातही विमानानं प्रवास करायचा असेल तर सामानाचं हेच पॅकिंग खूपच विचारपूर्वक आणि तोलून मापून करावं लागतं.
उत्तम पॅकिंग हा प्रवासाचा बेसिक मंत्र आहे. पण या पॅकिंगसाठी काय करावं हे जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं ते काय करु नये हे लक्षात ठेवून पॅकिंग करणं. जर पॅकिंग नीट झालं नाही तर प्रवासभर किरकोळ गोष्टींसाठी धावपळ करावी लागते नाहीतर मग गैरसोय सहन करावी लागते. म्हणूनच पॅकिंगमध्ये सरसकटपणे केलेल्या चुका समजून घेऊन त्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.
पॅकिंग करताना काय काळजी घ्याल?
सामानाची बेशिस्त बांधाबांध टाळा
प्रवासाला जातानं त्या ठिकाणाच्या हवामानाची माहिती घेणं, किंवा नेमकं काय पॅक करायला हवं याइतकंच महत्वाचं आहे तुमची बॅग संपूर्ण प्रवासात शिस्तबद्ध ठेवणं
पॅकिंग क्यूब्ज हे तुमच्या यादीत सर्वात वरच्या क्रमाकांवर असायला हवेत. कारण वेगवेगळ्या वस्तू बॅगमधून अलगद शोधून काढण्यासाठी ते तुमच्या कामी येतात. शिवाय काही पारदर्शक पॅकिंग क्यूबचा फायदा हा होतो की सुरक्षा तपासणीवेळी तुम्हाला तुमची सगळी सौंदर्य प्रसाधनं टेबलावर पसरावी लागत नाहीत. तेव्हा प्रवासाला जाताना तुमची बॅगही अशी निवडा जिला काही मल्टीपरपज कंपार्टमेंट असतील. किंवा तुम्ही पॅकिंग क्यूब्ज आॅनलाइन खरेदीही करु शकता.
या बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवल्यात, तरी तुमचे प्रवासातले निम्म्याहून अधिक श्रम नक्कीच वाचतील.