शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग करताना ‘डोळा लागतो’ का?; डुलकीचा धोका टाळण्यासाठी टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 06:45 IST

गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला आणि अपघात झाला! हे अपघातामागचं कारण आपण अनेकदा ऐकतो. प्रश्न पडतो की, आपल्याला झोप आली हे चालकाला कसं कळत नाही?

गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला आणि अपघात झाला! हे अपघातामागचं कारण आपण अनेकदा ऐकतो. प्रश्न पडतो की, आपल्याला झोप आली हे चालकाला कसं कळत नाही? क्षणात घात करणारी ‘मायक्रोस्लीप’ अशीच असते. ती आलीये हे कळतच नाही.

मायक्रोस्लीप म्हणजे काय? वाहन चालवताना येऊ शकणारी ही मायक्रोस्लीप अतिशय घातक असते. काही सेकंदासाठी डोळा लागणं म्हणजे मायक्रोस्लीप. हा डोळा इतका क्षणात लागतो की आपला डोळा लागतोय, हे कळतच नाही. ही मायक्रोस्लीप फक्त रात्रीच लागू शकते असं नाही, उलट ती मुख्यत्वे दिवसाच लागते. तुम्ही जागे असलेले वाटता, डोळे उघडेही असतात आणि झटक्यात ही मायक्रोस्लीप येऊ शकते. मेंदूला याबद्दल माहिती देण्याचीही उसंत मिळत नाही. अपुरी झोप झालेली असल्यास किंवा झोपेशी निगडित काही समस्या असल्यास काम करताना विशेषत: वाहन चालवताना, अवजड मशीनवर काम करताना अचानक मायक्रोस्लीप येण्याचा धोका असतो.

या मायक्रोस्लीपमुळे गाड्यांची समोरासमोर टक्कर होणं, गाडी रोडच्या खाली घसरणे असे गंभीर अपघात होऊ शकतात. म्हणूनच गाडी चालवण्याआधी आपण पूर्ण ‘अलर्ट’ आहोत ना याची खात्री करून घ्यावी. तंद्री लागत असल्यास आधी गाडी चालवणं थांबवावं. किंवा डोक्यात विचार गरगरत असतील, तर  सावध व्हावं. गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी करावी आणि व्यवस्थित आराम करावा. सोबत कोणी असल्यास आणि ते गाडी चालवण्यासाठी सुयोग्य वाटत असल्यास त्यांना गाडी चालवण्यास सांगावी. 

मायक्रोस्लीपचा धोका टाळण्यासाठी..अवेळी, अचानक येऊ शकणारी ही घातक डुलकी अर्थात मायक्रोस्लीपचा धोका टाळायचा असल्यास झोपेकडे दुर्लक्ष करणं आधी थांबवावं. रोज आपली पुरेशी झोप होईल, याची काळजी घ्यावी. शांत आणि पुरेशी झोप झाली तरच आपण दिवसभर उत्साही आणि सजग राहू शकतो. ‘द नॅशनल स्लीप फाउंडेशन’ सांगते, प्रौढांना ७ ते ९ तासांची झोप आणि किशोर वयातील मुला-मुलींना त्यापेक्षा अधिक झोप आवश्यक आहे. रात्री झोप नीट लागण्यासाठी झोपण्याच्या तासभर आधी टीव्ही बंद करायला हवा. रात्रीच्या झोपेकडे गांभीर्यानं लक्ष दिल्यास दिवसाढवळ्या, काम करताना येणाऱ्या मायक्रोस्लीपचा धोका टाळता येतो.