शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उचकी थांबविण्यासाठी हे करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:47 IST

आपली कोणीतरी आठवण केली म्हणून उचकी लागली असे बहुतांश लोकांचा समज आहे, मात्र वैद्यक शास्त्रानुसार उचकी येण्याचे शास्त्रीय कारण वेगळेच आहे.

आपली कोणीतरी आठवण केली म्हणून उचकी लागली असे बहुतांश लोकांचा समज आहे, मात्र वैद्यक शास्त्रानुसार उचकी येण्याचे शास्त्रीय कारण वेगळेच आहे. का लागते उचकीआपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्वासपटल असते. नैसर्गिक श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे आकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि ‘हिक्’ असा आवाज येतो. या क्रियेला उचकी लागणे म्हणतात. शिवाय खोलीचे तापमान बदलल्यास, गरम खाल्ल्यानंतर, शीतपेय पिल्यास आणि धूम्रपान केल्याने उचकी येते. काही लोकांना चिंतेत असल्यास किंवा खुश असल्यावरही उचकी लागते. उचकी थांबविण्यासाठी कराल?उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने उचकी थांबते अशी जुनी समजूत आहे.उचकी लागल्यास जीभेखाली मध ठेवा.बर्फ  किंवा तत्सम थंड पदार्थ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवल्यास उचकी लगेच बंद होईल. आणखी एक उपाय म्हणजे पेपर बॅग किंवा कापड तोंडाशी घेऊन श्वास घ्या आणि सोडा. यामुळे रक्तातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढून तुमची उचकी थांबेल.