शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी केलेल्या प्रयत्नांची सार्वजनिक चर्चा नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:50 IST

निळ्य़ा रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन आकर्षणाचे केंद्र बनले होते. निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे. 

निळ्य़ा रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन आकर्षणाचे केंद्र बनले होते. निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे. अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'शी बच्चन यांची खास मुलाखत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुरू झाली.प्रश्न : तुम्ही सामाजिक उपक्रमांशी संबंधित असता. त्यांचीही चर्चा व्हायला नको का?आम्ही समाजासाठी जे करतो तो एक छोटासा प्रयत्न असतो व ते खासगीच असावे अशी आमची इच्छा असते. त्यावर सार्वजनिकरित्या चर्चा करणे हे काही योग्य होणार नाही. जे योग्य वाटते त्याची आम्ही स्वत: मीडियाशी चर्चा करीत असतो. तुम्ही लोक आमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करीत असता व त्यासाठी आम्ही प्रसारमाध्यमांचे आभारी आहोत.प्रश्न : तुम्ही गुजरातच्या पर्यटनासाठी ब्रँड अँम्बेसिडॉर बनले होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही मोहिमेत किंवा योजनेत सहभागी होत नाही असे म्हणून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. मग आता त्याची भरपाई केली जात आहे असे समजायचे का?नाही. आम्ही असा कधीही विचार केला नाही. हे बघा आम्ही कधीही कोणाकडे काही म्हणायला जात नाही. जो कोणी आमच्याकडे येईल व आम्हाला वेळ असतो तेव्हा आम्ही त्यासाठी नेहमीच तयार असतो. गुजरात असो की महाराष्ट्र किंवा अन्य कोणतेही राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही योजना आम्ही असा नेहमीच विचार केला आहे की आमचा हातभार लागल्यामुळे जर काही चांगले होत असेल तर आम्ही नेहमीच तत्पर असतो. आताही तोच प्रयत्न आहे.वाघांची घटती संख्या हा मोठय़ा काळजीचा विषय आहे व ती कमी करण्यासाठी किती तरी संघटना आणि सरकार एकत्रित प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांत प्रसार माध्यमेही सहभागी आहेत.आम्हाला या प्रयत्नांत सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा आम्हालाही वाटले की यात आपलाही सहभाग असला पाहिजे. आनंदाची बाब म्हणजे याबद्दल सकारात्मक वातावरण तयार होत आहे.आम्ही नेहमीच असे म्हणत आलो आहोत की आम्ही सोबत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकत असेल तर आम्ही काम करायला तयार असतो.आम्हाला वाहतूक पोलिसांकडून विचारणा झाल्यावर लगेच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आम्हाला पुढेही अशी कुठलीही संधी मिळाल्यास त्या प्रयत्नांत आम्ही तत्परतेने सहभागी होऊ.