कोपरांचा काळवटपणा करा नाहीसा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:35 IST
आपल्या त्वचेचा रंग गोरा असूनही बऱ्याचदा हाताच्या कोपराची त्वचा काळवंडलेली दिसते.
कोपरांचा काळवटपणा करा नाहीसा..
आपल्या त्वचेचा रंग गोरा असूनही बऱ्याचदा हाताच्या कोपराची त्वचा काळवंडलेली दिसते. कदाचित अस्वच्छतेमुळे झाले असावे असे आपणास वाटते, मात्र तसे नसून या भागात मृत पेशी साठल्याने हा कोपरा निस्तेज दिसतो. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कोपरांचा काळपटपणा नाहीसा करू शकता...* दोन चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे दूध टाकून व्यवस्थित मिक्स करा व बोटांच्या साहाय्याने कोपरावर हे मिश्रण लावा. १० मिनिटांनी ते स्वच्छ करा. बेकिंग सोड्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात तर दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडमुळे त्वचेचा स्कीन टोन सुधारतो. * लिंबाचा एक तुकडा घेऊन कोपरावरील काळ्या डागावर घासा. तीन तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यानंतर त्यावर मॉयश्चरायजर लावा. लिंबातील सायट्रिक अॅसिडमुळे ते ब्लिचींगचे काम करते. असे सातत्याने केल्यास कोपºयाचा काळवटपणा नाहीसा होतो. * दही व लिंबाचे मिश्रणदेखील यावर चांगला उपाय आहे. हे मिश्रण कोपरावर लावल्यानंतर १५ मिनिटांनी स्वच्छ धुवा. सुकल्यानंतर मॉयश्चरायजर लावा. त्याचप्रमाणे दोन चमचे साखरेमध्ये एक चमचा कोकोनट ऑईल मिक्स करा. हा स्क्रब कोपरावर लावा. यामुळे त्वचा उजळते.