शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

'डायबिटीस मेलिटस' म्हणजे नक्की आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 11:27 IST

सध्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने ग्रस्त आहेत. पण डायबिटीसबाबत बोलताना अनेकदा 'डायबिटीस मेलिटस' असा उल्लेख करण्यात येतो, पण तुम्हाला माहीत आहे का? नक्की डायबिटीज मेलिटस आहे तरी काय?

सध्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने ग्रस्त आहेत. पण डायबिटीसबाबत बोलताना अनेकदा 'डायबिटीस मेलिटस' असा उल्लेख करण्यात येतो, पण तुम्हाला माहीत आहे का? नक्की डायबिटीज मेलिटस आहे तरी काय? अनेक लोक याबाबत विचारणाही करतात. खरं तर डायबिटीस मेलिटस हा मेटाबॉलिज्म संबंधातील अनेक आजारांच्या समूहाचं नाव आहे. डायबिटीस मेलिटस (diabetes mellitus) ला डीएम (DM) या नावानेही ओळखलं जातं. डायबिटीस मेलिटस हा आजार रक्तातील साखरेच्या पातळीशी संबंधित आहे. सामान्य शब्दांमध्ये ज्या आजाराला लोक डायबिटीस असचं म्हणतात. पण यामध्ये सर्व प्रकारच्या डायबिटीसचा समावेश होतो. टाइप 1, टाइप 2 डायबिटीस, गर्भावधी डायबिटीस आणि सेकेंडरी डायबिटीस मुख्य स्वरूपात डायबिटीस मेलिटसचे प्रकार आहेत. 

डायबिटीस मेलिटसचे प्रकार... 

  • टाइप 1 डायबिटीस 
  • टाइप 2 डायबिटीस 
  • गर्भावधि डायबिटीस
  • सेकेंडरी डायबिटीस 

डायबिटीस आणि डायबिटीस मेलिटसमध्ये फारसं अंतर नाही. डायबिटीस एक प्रकारे आजारांच्या समुहाला व्यवस्थित सांगू शकत नाही. डायबिटीस मेलिटसमध्ये सर्व प्रकारच्या ब्लड शुगर संबंधातील आजारांचा समावेश होतो. 

ज्या व्यक्ती डायबिटीज मेलिटसच्या समस्यांनी ग्रस्त असतो. त्यांनी त्वरित उपचार करणं आवश्यक असतं. जर डायबिटीस मेलिटसवर उपचार केले नाहीतर यामुळे अनेक जीवघेण्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. 

डायबिटीस मेलिटसमुळे उद्भवणाऱ्या समस्या... 

  • डायबिटीस केटोएसिडोसिस
  • नॉनकेटोटिक हायपरोस्मोलर कोमा किंवा मृत्यू 
  • हृदय रोगांचं कारण 
  • स्ट्रोकचा धोका वाढतो 
  • क्रोनिक किडनी डिजीज
  • पायांना अल्सर होणं 
  • डोळ्यांच्या समस्या उद्भवणं

 

डायबिटीस मेलिटसची समस्या उद्भवल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात इन्सुलिन उत्पादन करू शकत नाही. शरीराच्या पेशींमध्ये इन्सुलिनचा प्रवाह सुरळीत होत नाही. तसेच इन्सुलिन निर्मितीमध्येही अडथळे निर्माण होतात. 

डायबिटीज मेलिटसची लक्षणं... 

  • सतत तहान लागणं 
  • सतत लघवी होणं 
  • सतत भूक लागणं 
  • डोळ्यांची दृष्टी कमी होणं 
  • शरीरात थकवा जाणवणं 
  • अचानक वजन कमी होणं 
  • जखम ठिक होण्यास वेळ लागणं 
  • यूरिन इन्फेक्शन होणं 
  • सतत डोकं दुखणं 

 

टाइप 1 डायबिटीस कोणत्याही व्यक्तीला अचानक होऊ शकतं. आतापर्यंत टाइप 1 डायबिटीस होण्याचं कारण समजू शकलेलं नाही. टाइप 2 डायबिटीस अनेकांमद्ये आढळून येतो. पण जर यावर लक्ष दिलं तर यापासून बचाव करणं शक्य होतं. गर्भावस्थेतील डायबिटीस आहारात आणि औषधांच्या सेवनाने उपचार करू शकता. सेकेंडरी डायबिटीस अचानक होतो आणि अचानक ठिकही होतो. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स