शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसमुळे डोळे जातील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:33 IST

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने डायबिटीसचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. डायबिटीसमुळे दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याची भीती आहे. 

डॉ. प्रीतम सामंत, रेटिना स्पेशालिस्ट, हिंदुजा हाॅस्पिटल -ही दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशातील नागरिकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहे, याबद्दल लॅन्सेटमध्ये शोधनिबंध सादर केला होता. डायबिटीसचा शरीरातील सर्व अवयवांवर दुष्परिणाम दिसून येतो. आपल्याकडे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यावर डॉक्टरकडे जाण्याची धावपळ सुरू होते. विशेष म्हणजे अनियंत्रित साखरेच्या प्रमाणामुळे डोळ्याला रेटिनोपॅथी नावाचा आजार होऊन दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात येतात आणि काहीही करून डोळा वाचवा, असे सांगतात. परंतु, त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. डोळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली असते. या गोष्टी टाळायच्या असतील तर ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्यांनी वर्षातून किमान दोन वेळा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळे तपासू नये. त्या दुकानात असणारे तज्ज्ञ डोळ्याच्या आजाराची माहिती देऊ शकत नाहीत. कारण ते त्यामधील तज्ज्ञ नसतात. केवळ डोळ्यात टॉर्च मारून या आजाराचे निदान करता येत नाही. याकरिता डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. रेटिनाचा (दृष्टिपटल) आजार तुम्हाला जडला आहे की नाही, हे पाहण्यासाठी डोळ्यांमध्ये औषध टाकून वैद्यकीय भाषेत ज्याला बुबुळ डायलेट करून बघितले जाते आणि त्यानंतर रेटिना स्पेशालिस्ट डोळ्यातील रेटिना किती खराब झाला आहे, हे सांगू शकतो. 

‘हे’ लक्षात घेतले पाहिजेकाही डायबिटीस रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात डॉक्टरकडे येतात. त्यावेळी डोळ्यांतील रक्तवाहिन्या फुटून डोळ्यांमध्ये गाठ तयार होते. त्यामुळे रेटिनाच्या पडद्याला सूज येते. या अशा परिस्थितीत रुग्णांची नजर खूपच कमी झालेली असते. त्यावेळी मात्र अशा रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. 

आपण या ठिकाणी रेटिनोपॅथीच्या आजारात एक लक्षात घेतले पाहिजे, या आजारात आहे ती नजर वाचविण्यास मदत होते. गेलेली नजर परत येत नाही. कॅटरॅक्टचे ऑपरेशन केल्यानंतर रुग्णांना चांगली नजर येते. 

या आजारात तसे होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे डायबिटीसचा आजार असणाऱ्या रुग्णांनी वेळच्या वेळी डोळे तपासून निदान करून उपचार घेतले, तर डोळ्याची नजर चांगली ठेवण्यास मदत होते.

अनेकवेळा या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून डोळ्याची नजर वाचविता येणे शक्य असते. डोळ्यात फार तर काही ड्रॉप्स टाकावे लागतात.मात्र, काही रुग्ण या आजाराच्या ‘मिडल स्टेज’ला येतात. त्यावेळी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये डोळ्यांची अँजिओग्राफी आणि डोळ्यांचा स्कॅन ज्याला आम्ही ओसीटी स्कॅन म्हणतो. या दोन तपासण्यांनंतर रेटिना किती खराब झाला आहे, हे समजते. त्यानंतर त्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांना डोळ्यात इंजेक्शन घ्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात दर महिन्याला त्यानंतर ती कमी करत बंद केली जातात. यामुळे आहे ती नजर वाचविण्यात मदत होते. इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया ही दहा मिनिटांत पार पडते. त्यासोबत काही वेळा लेसरचे उपचार घ्यावे लागतात.

टॅग्स :diabetesमधुमेहeye care tipsडोळ्यांची निगा