शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

​प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोक्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:16 IST

सध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते.

-Ravindra Moreसध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते. मात्र एका संशोधनानुसार प्लास्टिकच्या बॉटलचा प्रयोग करणे आरोग्यासाठी खूपच अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. जर आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित असाल तर आपणास कॅन्सर, मधुमेह, हृदय रोग हे आजार तसेच गर्भवती आई व तिच्या मुलाला धोका आहे. त्याशिवाय अजून धोकादायक आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कित्येक हानिकारक केमिकल्स असतात जे गरम झाल्यानंतर पाण्यात मिक्स होतात आणि तेच पाणी पिल्याने पाण्याबरोबर  पोटात गेलेल्या हानिकारक केमिकल्समुळे आपल्या शरीराला हानी पोहचते.कॅन्सर कॅन्सर तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिल्याने कॅन्सर होऊ शकतो. प्लास्टिकची बॉटल जेव्हा उन्हामुळे किंवा जास्त तापमानामुळे गरम होते तेव्हा प्लास्टिकमधले हानिकारक केमिकल डायआॅक्सिन वितळून पाण्यात मिक्स होते. हे पाणी पिल्याने पाण्यात मिक्स झालेले डायआॅक्सिन केमिकल आपल्या शरीरात प्रवेश करते. त्यानंतर आपल्या शरीरातील पेशींवर डायआॅक्सिन खूपच वाईट परिणाम करते. त्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. मेंदूवर प्रतिकूल परिणामप्लास्टिकच्या बॉटलमध्ये प्रयोग करण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए‘ मुळे मेंदूच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे मनुष्याची समजण्याची आणि स्मृतीची क्षमता कमी कमी होत जाते.  अपचन व अ‍ॅसिडिटी प्लास्टिकची बॉटल बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए’ मुळे पोटावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो. बीपीए नावाचे केमिकल जेव्हा पोटात पोहोचते तेव्हा पचनक्रियादेखील प्रभावित होते. यामुळे केलेले जेवण व्यवस्थित पचन नाही आणि पोटात गॅस निर्माण होऊन अ‍ॅसिडिटी होते. पोटाचे विकारगेल्या काही महिन्यांपासून आपण एकाच बॉटलमध्ये पाणी पित असाल आणि ती बॉटल वेळोवेळी स्वच्छ धुतली नसेल तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे  आपणास हमखास पोटाचे विकार होतील. आणि याचा विपरीत परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. मुलांमध्ये होऊ शकतो जन्म दोषबॉटल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल हे भ्रूणामध्ये असामान्य गुणसूत्र निर्माण करु शकते, ज्यामुळे मुलांमध्ये जन्म दोष होऊ शकतो. तसेच गर्भावस्थेदरम्यान बॉटलमधील पाण्याचे नेहमी सेवन होत असेल तर जन्माला येणाºया बाळाला भविष्यात प्रोस्ट्रेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.  गर्भपात होण्याचा धोकाप्लास्टिकच्या बॉटलमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे गर्भपाताचा धोका वाढतो. विशेषत: ज्या महिलांना गरोदर व्हायला काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा ज्यांचे अगोदर पहिल्यांदा मिसकॅरेज झाले असेल त्या महिलांनी प्लास्टिकच्या बॉटलमधले जास्त पाणी प्यायला नकोय. अशा पाण्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटदेखील कमी होते. कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर टाळाबहुतेक लोक पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला विक्री होत असलेल्या स्वस्त बॉटल खरेदी करतात. असे कदापी करु नये, कारण या बॉटल बनविताना रसायनांचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, गरम झाल्यानंतर ही रसायने पाण्यात मिक्स होतात, जी शरीरासाठी खूपच धोकेदायक ठरु शकतात.