शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदात्यांची ‘मेमरी वॉल’ तयार करणार; राज्याचे अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण धोरण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 10:20 IST

अवयवदात्याचा उचित सन्मान व्हावा याकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अवयवदात्यांची ‘मेमरी वॉल’ तयार करणार  करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी राज्यामध्ये प्रथमच धोरण जाहीर करण्यात आले आहे. 

अवयवदात्याचा उचित सन्मान व्हावा याकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अवयवदात्यांची ‘मेमरी वॉल’ तयार करणार  करण्यात येणार आहे. तसेच  अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचे ज्ञान मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना मिळावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची मान्यता घेऊन एक वर्षाचा क्रिटिकल केअर विषयातील पदव्युत्तर फेलोशिप कोर्स सुरू करणार आहे.   राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. 

याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

धोरणात काय?     सर्व मेडिकल कॉलेजमध्ये क्रिटिकल केअर विभाग स्थापन करून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून त्याकरिता वैद्यकीय आयोगाच्या निकषांचे पालन करणार. ज्या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे  शक्य नाही, त्या ठिकाणी  एक वर्षाची या विषयातील फेलोशिप सुरू करणार

    २५ वैद्यकीय महाविद्यालयांकरिता ५० ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर पद निर्माण करणार, महिन्याकाठी ठोक मानधन ३५ हजार रुपये देणार    अवयवदात्याचा रुग्णालयाचा खर्च रुग्णालय स्तरावर करण्यात यावा,  तसेच मृतदेहासोबत घरी जाण्याकरिता अवयवदात्याच्या कुटुंबीयाला वाहनाचा खर्च झेटसीसीमार्फत उपलब्ध करून देणार.      अवयवदात्याच्या नातेवाइकाची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शासकीय विश्रामगृहात करणार

    प्रजासत्ताक दिनी शासकीय समारंभात अवयदात्याच्या कुटुंबीयांचा सत्कार करणार     मुंबई शहराकरिता उतीपेशी केंद्र जे. जे. रुग्णालयात उभारणार

    सात मेडिकल कॉलेजमध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्र उभारणार, १६५ कोटी खर्च करणार     अवयवदात्याचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार

    सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये (एनटीओआरसी) पुनर्प्राप्ती केंद्र निर्माण करणार 

टॅग्स :Organ donationअवयव दान