शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खोकला, ताप, अंगावर; न्यूमोनियाचा धोका! नागरिकांत मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 09:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही  महिन्यांपासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ आहे. अनेकांना  तापासोबत खोकला, ताप, डोकेदुखी, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही  महिन्यांपासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ आहे. अनेकांना  तापासोबत खोकला, ताप, डोकेदुखी, घसादुखी, अंगदुखी, उलट्या, थकवा, श्वास घेण्यास त्रास या स्वरुपाची लक्षणेही दिसतात. रक्त चाचण्यांचे निदान करून सुद्धा कुठलाही विशेष आजार नसल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर सुद्धा लक्षणानुसार उपचार करत आहेत. ताप कमी होत असला तरी खोकला मात्र अनेक दिवस राहत असल्याच्या तक्रारी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे; मात्र हा खोकला काही काळ राहिला तर न्यूमोनिया होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.  सध्या या व्हायरल आजारासोबत डासांच्या आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार डेंग्यू आणि मलेरिया हे डासांपासून होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एका बाजूला व्हायरल आजार आणि दुसऱ्या बाजूला साथीचे आजार यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील सर्वच सार्वजनिक रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. 

 न्यूमोनिया  म्हणजे काय     सोप्या शब्दात सांगायचं झाले तर फुप्फुसात जिवाणू किंवा विषाणूच्या बुरशीमुळे निर्माण झालेला संसर्ग होय. त्याला अनेकवेळा फुप्फुसात पाणी झाले आहे, असेही म्हणतात.     श्वसनमार्गाचा हा आजार लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे खोकला एका विशिष्ट कालावधीनंतर सुद्धा थांबत नसल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. कारण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर न्यूमोनियाच्या आजारांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

कोणत्याही तापाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आजार झाला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजाराचे स्वरूप छोटे किंवा मोठे याचा निर्णय स्वतः घेऊ नका तसेच औषधांचा वापर करू नका. अन्यथा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. काही आजाराच्या निदानासाठी रक्त चाचण्यांची गरज असते. त्यामुळे योग्यवेळी योग्य चाचण्या करण्याची गरज असते. त्यानंतर निदान झाल्यानंतर उपचारपद्धती निश्चित केली जाते. व्हायरल आणि साथीचे आजार सध्या सुरू असले तरी रुग्णांना नेमके काय झाले आहे, ही लक्षणे पाहिल्यावर निदान करणे शक्य होते. ओपीडीत मोठ्या संख्येने हे रुग्ण येत असतात.     - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, वैद्यकशास्त्र  विभाग, जे जे रुग्णालय