शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: डोकेदुखी आणि कोरोनाचा काय संबंध?; रिपोर्टमध्ये मुख्य लक्षणांमध्ये आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:44 IST

डोकेदुखी हे कोरोनाचे मुख्य लक्षण असले तरी डोकेदुखी झाली म्हणजे कोरोनाचा संसर्गच झाला असे नव्हे. डोकेदुखीला इतरही अनेक कारणे असू शकतात.

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर कोरोना हा आजार आता सौम्य झाला असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. असे असले तरी साथ अजून पूर्णत: संपलेली नाही तसेच एका अभ्यासात सहभागी झालेल्या ६९ टक्के रुग्णांत कोरोनाचे मुख्य लक्षण आढळून आले आहे.

डोकेदुखी वाढली आहे का?सार्स-कोव्ही-२ या विषाणूचा व्हेरियंट ओमायक्रॉनचे बीए.४ आणि बीए.५ हे सबव्हेरियंट वेगाने पसरत आहेत. विशेषत: अमेरिका आणि ब्रिटन या देशांत नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यातच ब्रिटनच्या ‘झोए कोविड स्टडी’ नावाच्या एका ॲपने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ६९ टक्के रुग्णांत कोविड-१९ संसर्गानंतर दिसणारे प्रमुख लक्षण आढळून आले आहे. हे लक्षण म्हणजे डोकेदुखी होय.

चिंता करावी का?कोरोना रुग्णांत डोकेदुखी हे प्रमुख लक्षण आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात डोकेदुखी हेच प्रमुख लक्षण रुग्णांत असते. त्यामुळे अभ्यासातील निष्कर्ष चिंता वाढविणारा आहे. त्याचवेळी काही दिलासादायक बाबीही समोर आल्या आहेत. डोकेदुखी येते आणि जाते. हळूहळू ती कमी होत जाते, असे आमच्या डेटामधून दिसून येते.

कोरोनाची डोकेदुखी?डोक्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात.डोक्यात काही तरी मारल्यासारखे, दाब दिल्यासारखे जाणवते. डोक्याच्या दोन्ही बाजूंनी वेदना.डोकेदुखी तीन दिवसांपेक्षा अधिक राहते. औषधांचा उपयोग होत नाही.

डोकेदुखी म्हणजे कोरोनाच आहे का?डोकेदुखी हे कोरोनाचे मुख्य लक्षण असले तरी डोकेदुखी झाली म्हणजे कोरोनाचा संसर्गच झाला असे नव्हे. डोकेदुखीला इतरही अनेक कारणे असू शकतात. कारण डोकेदुखी ही दैनंदिन जीवनातील सामान्य बाब आहे. तणाव, झोपेच्या सवयीतील बदल, जेवण टळणे, शरीरातील पाणी कमी होणे, ठरावीक पदार्थांचे सेवन व मद्यपान आदी अनेक कारणांनी डोकेदुखी होऊ शकते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या