शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:11 IST

कोरोनामध्ये पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात.

>> डॉ. अमोल अन्नदाते

‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात.

जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते .

जुलाब असल्यासआपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या