शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:10 IST

केंद्राकडून परवाना फक्त उत्पादन, साठवणुकीसाठी

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा संयुक्तपणे विकसित करीत असलेली कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस भारतीयांना ७३ दिवसांत व मोफत उपलब्ध होणार नाही असे सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. तशा प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा कंपनीने इन्कार केला आहे. लसीचे उत्पादन व साठवणूक यापुरताच केंद्र्र सरकारने आम्हाला परवाना दिला असल्याचे या कंपनीने सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असून, ते प्रयोग यशस्वी ठरल्यास तसे आम्ही सर्वांना कळविणारच आहोत. त्यानंतरच लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल. कोविशिल्डच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीशी करार केला आहे.

कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील चाचण्या भारतामध्ये करण्यास केंद्र्र सरकारने परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये १६०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. स्वदेशात बनत असलेल्या लसींपैकी एका लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. ही लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ शथीर्चे प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले. गाझियाबाद येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते.वर्षअखेरपर्यंत लस शक्यभारत या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याची शक्यता आहे, असे केंद्र्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.माहिती देण्यासाठी वेबसाईटदेश व विदेशामध्ये कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासंदर्भातील संशोधनाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था लवकरच एक वेबसाईट सुरू करणार आहे. या वेबसाईटवर इंग्रजी, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये ही माहिती देण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या