शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! व्हिटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:01 AM

कोविड-१९’च्या निमित्ताने सगळ्यांनी विटामिन डी घेऊन ही विटामिन डी कमतरतेची साथ संपवता येईल.

डॉ. अमोल अन्नदातेव्हिटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन डी घेतल्यावर कोरोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही, असे म्हणता येणार नाही. पण तो झाला तर व्हिटॅमिन डीची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास विषाणूशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल. तसेच मृत्यूसाठी कारण ठरणारे ‘एआरडीएस’ म्हणजे फुफ्फुससाला इजा होऊन ती निकामी होण्याचे प्रमाणही व्हिटॅमिन डी शरीरात नॉर्मल असल्यास कमी होऊ शकते. याशिवाय कुठल्याही जंतुसंसर्गात थोड्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या सायटोकाईन या घटकाचे बाधिताच्या शरीरात वादळ येते. याला सायटोकाईन स्टॉर्म असेच म्हणतात. हे थोपवण्यासाठीदेखील विटामिन डी उपयोगी पडते.

व्हिटॅमिन डी हे आपल्याला अन्नातून फारसे मिळत नाही. याचा महत्वाचा स्त्रोत असतो सूर्यप्रकाश. पण सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी रोज सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान कधीही अर्धा तास कमीत कमी (अर्ध्या बाहीचा पातळ शर्ट व अर्धी चड्डी) कपडे घालून त्वचेचा जास्तीत संपर्कप्रकाशाशी येऊ दिला पाहिजे. पण आजच्या युगात हे कोणालाही शक्य नाही. म्हणून देशातील ८० टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. खर तर या कमतरतेमुळे हाडांच्या अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून या साथीपूर्वी व्हिटॅमिन डी कमतरतेची दुर्लक्षित साथ अनेक दशकांपासून आपल्या देशात सुरु आहे. ‘कोविड-१९’च्या निमित्ताने सगळ्यांनी विटामिन डी घेऊन ही विटामिन डी कमतरतेची साथ संपवता येईल. यासाठी ६०,००० कव व्हिटॅमिन डी दर आठवड्याला ८ आठवडे १२ वर्षांपुढील सर्वांनी घेण्यास हरकत नाही. या नंतर दर महिन्याला एकदा ६०,००० कव घ्यावे. व्हिटॅमिन डी रिकाम्या पोटी घेऊ नये. जेवणानंतर घ्यावे कारण ते चरबीत विरघळणारे व्हिटॅमिन असल्याने जेवणासोबत शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. शक्य झाल्यास दर वाढदिवसाला आपल्या रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी तपासून घ्यावी. तिचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.

अपेक्षित नॉर्मल पातळी : ५०-६० नॅनो ग्रॅम प्रति मिलीलीटरपातळी कमी असणे : २०-३० नॅनो ग्रॅम प्रति मिलीतीव्र कमतरता : २० नॅनो ग्रॅम प्रति मिलीपेक्षा कमी (लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या