शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शिंक, खोकल्याने १० मीटर अंतरापर्यंत पसरतो कोरोना; बचावासाठी कोणता मास्क घालावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 06:31 IST

थुंकी आणि श्लेष्माचे (फ्लेम) कणसुद्धा दीर्घकाळ विषाणू पसरण्याचे कारण होऊ शकतात; म्हणूनच अनेक राज्यांत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकल्यास दंडाची तरतूद केलेली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या नवीन सल्लात्मक मार्गदर्शक सूचनेनुसार एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या खोकल्यातून आणि शिंकेतून कोरोनाचे विषाणू हवेत दहा मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात. तेव्हा मास्क नेहमी घालणे जरुरी आहे. एवढेच नव्हेतर, लक्षण नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा खोकला आणि शिंकेतून विषाणूचा फैलाव होऊ शकतो. शिंक आणि खोकल्यातून जमिनीवर पडणारे तुषार आणि सूक्ष्म तुषार कणसुद्धा संसर्गाचे कारण होऊ शकतात. 

थुंकी आणि श्लेष्माचे (फ्लेम) कणसुद्धा दीर्घकाळ विषाणू पसरण्याचे कारण होऊ शकतात; म्हणूनच अनेक राज्यांत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकल्यास दंडाची तरतूद केलेली आहे. नेहमी हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंची (जसे दरवाजाची कडी-कोयंडा, दिव्याची बटणे,  टेबल, खुर्ची आदी) निर्जंतुकीकरण द्रवपदार्थाने नियमित साफसफाई करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. या सल्लात्मक मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या ठिकाणी हवा खेळती (व्हेन्टिलेशन- वायूविजन) आहे, अशा ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. त्यासाठी घर आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती ठेवणारी चांगली व्यवस्था असावी.

दुहेरी किंवा एन-९५ मास्क...कोरोनापासून बचावासाठी दुहेरी मास्क (डबल मास्क) किंवा एन-९५ मास्क घालावा.  कापडी मास्क वापऱ्याचा असल्यास दोन मास्क घालावेत; परंतु, सर्जिकल मास्क असेल तर एक पुरेसा आहे. डबल मास्क पाचवेळा वापरता येतो. संसर्गित व्यक्तीच्या नाका-तोंडातून शिंक, गातांना, खोकलताना, बोलताना, हसतांना बाहेर पडणारे तुषार, हे संसर्ग वहनाचे मार्ग आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या