शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या 'या' सवयींकडे दुर्लक्ष केल्याने अडकू शकता कोरोनाच्या जाळ्यात, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:31 IST

लॉकडाऊनचं पालन करण्याप्रमाणेच वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेच आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा प्रचंड वेगाने होत आहे. कोरोनापासून लोकांना वाचवता यावं यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात करण्यात आले. लॉकडाऊनचं पालन करण्याप्रमाणेच वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेंच आहे. कारण लॉकडाऊनचं पालन करत असाताना सुद्धा तुमच्या रोजच्या काही चुकांमुळे कोरोनाचे शिकार होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला काही सवयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजचं बदलायला हव्यात.

चादरी, कपडे धुवा

सध्या कोरोना व्हायरसचं संक्रमण लक्षात घेता तुम्ही आठवड्यातून किमान २ वेळा बेडशीट धुणं गरजेच आहे.   घातलेले कपडे रोजच्या रोज धुवून स्वच्छ ठेवा. बाहेर जाऊन  आल्यानंतर त्याच कपड्यांवर घरात फिरू नका. ते कपडे बदलून फ्रेश  होऊन मगच घरात वावरा. 

शेअर करून खाऊ नका

घरी कुटुंबासोबत, ऑफिसमध्ये मित्रमैत्रिणींसोबत आपण जेवण शेअर करून खात असतो. पण सध्याच्या परिस्थितीतत असं करणं तुमच्याासाठी हानीकारक ठरू शकतं. म्हणून शेअर करून खाऊ नका. 

बाथरुममध्ये टुथब्रश ठेऊ नका

कोरोनापासून बचावासाठी स्वतःची स्वच्छता राखणं अतिशय गरजेच आहे. पण ब्रश केल्यानंतर तो बेसीनवर किंवा बाथरुममध्ये ठेवण्याची सवयीमुळे तुम्हा आजारी पडू शकता. या ठिकाणी अनेकादा बॅक्टेरियांची वाढ होते. जे तोंडातून तुमच्या शरीरात जाऊ शकतात. म्हणून आधीच सावधातना बाळगणं गरजेचं आहे.

नखं खाणं

आपल्या नखांमध्ये अनेकदा बॅक्टेरीया राहू शकतात. त्यामुळे न धुता जर आपण हात तोंडात घातले. तर हे बॅक्टेरिया तोंडावाटे आपल्या शरीरात जातात. व्हायरसच्या संक्रमणाला तुमची ही सवय कारणीभूत ठरू शकते. म्हणून नखं खाण्याची सवयं सोडा.

खाल्यानंतर दातांना हात लावणं

अनेकदा  खाल्यानंतर आपल्या दातात काही ना काही अडकून राहतं. अनेकांना हे बोटांनी साफ करण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच सोडा. कारण यामुळे बॅक्टेरियाचं इन्फेशन होऊ शकतं.

चेहरा आणि केसांना हात लावणं

सतत चेहरा आणि केसांना हात लावल्यामुळे इन्फेक्शन पसरू शकतं. केसांमधील बॅक्टेरीया हातांमार्फत तुमच्या शरीरात जाऊ शकता.  एखाद्या इन्फेक्टेड वस्तुला हात लावल्यानंतर त्वचेला लावल्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या