शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जानेवारी-फेब्रुवारीत लस येणार; ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:03 IST

पुण्यात भारती हॉस्पिटलमध्ये दिला दोघांना डोस

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस बुधवारी भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. दोन स्वयंसेवकांना प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करून लसीचा अर्धा मिलिलीटर डोस देण्यात आला. दोन्ही स्वयंसेवक पुरुष असून त्यांची वये अनुक्रमे ३२ आणि ४७ वर्ष आहेत.

दोन्ही स्वयंसेवकांना २८ दिवसांनी (सप्टेंबर महिन्यात) दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस दिल्यापासून ५७व्या दिवशी (आॅक्टोबर महिन्यात) तपासणीसाठी बोलावले जाईल. ९० दिवसांनी (नोव्हेंबर महिन्यात) त्यांच्यामध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत का, आरोग्याच्या इतर तक्रारी हे पाहिले जाईल. १८० दिवसांनी (फेब्रुवारी महिन्यात) त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाऊन लसीची यशस्विता तपासली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. यावेळी डॉ. अस्मिता जगताप, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

येत्या सात दिवसात २५ स्वयंसेवकांना लस देण्यात येईल. देशभरात शंभर जणांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षांवरील निरोगी स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवक निवडताना प्रथमत: त्यांची आरटीपीसीआर आणि अ‍ॅँटिबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.मानवी चाचणीसाठी सुमारे ३०० जणांनी नोंदणी केली आहे. दोघांना लसीचा डोस देण्यात आला. निवड झालेल्या स्वयंसेवकांपैकी ७५ टक्के जणांना कोव्हिशिल्ड लस तर २५ टक्के लोकांना प्लासेबो इफेक्ट मिळणार आहे. तिसºया टप्प्यात दीड हजार जणांना लस दिली जाईल. त्यानंतर माहितीचा अहवाल शासनाला पाठविला जाईल. प्रत्यक्ष लस बाजारात येण्यासाठी जानेवारी उजाडेल. - डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमानवी चाचणीतील टप्पे२६ ऑगस्ट : लसीचा पहिला डोस२४ सप्टेंबर : लसीचा दुसरा डोस२४ नोव्हेंबर : अँटिबॉडी तयार होण्याची प्रक्रिया, लसीचे दुष्परिणाम याबाबत तपासणी२४ फेब्रुवारी : १८०व्या दिवशी अंतिम तपासणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या