शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’; धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 00:29 IST

CoronaVirus News : फ्रान्सच्या माध्यमांमध्ये सुरुवातीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले, पण नंतर तिथेही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा अभ्यास अपूर्ण असल्याचे सांगितले.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात केलेल्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला, की धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका व त्यामुळे मृत्यूची शक्यता कमी आहे. पण नंतर या अभ्यासाच्या त्रुटी लक्षात आल्या व जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हणण्यास अजून कुठलाही संशोधनात्मक आधार नसल्याचे जाहीर केले. तसेच धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही, असे जाहीर केले.फ्रान्सच्या माध्यमांमध्ये सुरुवातीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले, पण नंतर तिथेही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा अभ्यास अपूर्ण असल्याचे सांगितले. एक तर या अभ्यासात केवळ ४८२ जणांचाच अभ्यास केला होती. ठामपणे निष्कर्ष काढण्यास ही संख्या कमी आहे. तसेच यात सामील असलेल्यांनी आधी धुम्रपान सोडले आहे, अशांची ही बरे झालेल्यांमध्ये गणना करण्यात आली. तसेच प्रत्येक वैद्यकीय संशोधनात्मक अभ्यासाचे इतर संशोधक आणि तज्ज्ञांकडून पडताळणी करूनच तो निश्चित मानला जातो.अजून या अभ्यासाची अशी कुठलीही पडताळणी झाली नसताना तो अति उत्साहात फ्रान्सच्या माध्यमात छापण्यात आला. तिथून तो जगभर पसरला. पण कोणीही या भ्रमात राहू नये. उलट धूम्रपान करीत असलेल्यांना फुफ्फुसाला इजा झाल्यामुळे कोरोनाच नव्हे, तर इतर कुठल्याही जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर या सर्वांचा धोका जास्त असल्याने कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका जास्त असू शकतो. म्हणूनच मद्यपानाप्रमाणे कोरोनाही धूम्रपान सोडण्यास चांगली संधी आहे.- अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या