शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

CoronaVirus News: रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 12:56 IST

CoronaVirus News: रेमडेसिविर आणि महागड्या औषधांशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जामखेडमधील शेकडो रुग्णांसाठी ठरले देवमाणूस

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी धावाधाव करत आहेत. मात्र अहमदनगरमधील डॉ. रवी आरोळे रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास ५ हजार रुग्णांना रेमडेसिविरचा वापर न करता कोरोनामुक्त केलं आहे.ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!सध्या रेमडेसिविरची प्रचंड चर्चा सुरू आहे. मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाबाजार होऊ लागला आहे. रेमडेसिविरशिवाय उपचार शक्य नसल्याचं म्हणत काही रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर आणण्यास सांगत आहेत. तर काही ठिकाणी रुग्णाचे नातेवाईकच रेमडेसिविरचा आग्रह धरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रवी आरोळेंशी लोकमतनं संवाद साधला. त्यात त्यांनी रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांना कसं बरं करता येतं, याबद्दलची उपचारपद्धतच सांगितली.आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार गंभीर अवस्था असलेल्या ५ टक्के रुग्णांसाठी रेमडेसिविर वापरण्यात यावं. पण एम्सच्या नव्या गाईडलाईन्सनुसार रेमडेसिविर वापरण्याची सक्ती नाही, असं डॉ. आरोळेंनी सांगितलं. 'कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुसांना सूज येते. शरीराला ऑक्सिजन कमी पडू लागतो. या दोन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याआधीही विविध आजारांमुळे फुफ्फुसांना सूज यायची. स्टेरॉईड्समुळे ही सूज कमी करता येते. स्टेरॉईड्स स्वस्त असतात आणि सहज उपलब्धदेखील होतात. त्यामुळे आम्ही सूज कमी करण्यासाठी स्टेरॉईड्स वापरतो. स्टेरॉईड्स किती द्यायचे याचं प्रमाण रुग्णाच्या शरीराच्या वजनावर ठरतं,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली.ऑक्सिजन कमी पडत असल्यास ऑक्सिजन थेरेपीचा वापर करतो. याशिवाय आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्स वापरतो. कधी कधी सुरुवातीला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स वापरतो. हे पण सहज उपलब्ध आहे. याशिवाय ते स्वस्तदेखील आहेत. सुरुवातीला स्टेरॉईड्स दिल्यानंतर आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्सचा वापर करतो. ऑक्सिजन थेरेपी सुरू करतो. अँटिव्हायरल औषधं तर आता सर्रास उपलब्ध होतात. त्यांचा वापर करतो. स्टेरॉईड्स, ऑक्सिजन थेरेपी, ब्रॉन्कोडायलेटर्स, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स या चार गोष्टी मुख्य उपचारांचा भाग आहेत. यानंतरचे उपचार रुग्णामध्ये दिसणाऱ्या लक्षणांवर अवलंबून असतात. कोणाला डोकेदुखीचा त्रास होतो. कोणाला जुलाब होतात. या लक्षणांनुसार मग प्रत्येकाला उपचार दिले जातात, अशा शब्दांत डॉक्टरांनी रेमडेसिविरशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त कसं करता येतं, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीर